गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 11 ऑक्टोबर 2010 (11:53 IST)

आज 13 पदकांसाठी खेळाडू आमने-सामने

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता खर्‍या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. कांगारु, भारत व इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये सुवर्ण पदक पटकावण्‍यासाठी जोरदार स्पर्धा असून, आज 13 सुवर्ण पदकांचा निकाल लागणार आहे.

भारताने आतापर्यंत 29 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आज एथेलेटिक्समध्ये सहा व धावण्‍याच्या शर्यतीत एक सुवर्ण पदक आहे. धावण्‍याच्या शर्यतीत पी टी उषाची शिष्या टिंटु लुकाकडून भारतीयांना आशा आहेत.

नेमबाजीसाठीही आज स्पर्धा होत असून, यात भारताचेच पारडे जड मानले जात आहे. थाळी व गोळा फेक स्पर्धाही आज घेतली जात आहे.