शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वार्ता|

प्रणव मुखर्जी यांची आकडेवारी खरी ठरली

लोकसभेतील मतदानानंतर आज जाहीर झालेला निकाल म्हणजे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल भाषणात दिलेल्या आकड्यांची 'डिक्टो कॉपी' आहे.

सरकारच्या पारड्यात आज २७५ तर विरोधकांना २५६ मते मिळाली. श्री. मुखर्जी यांनी काल हाच आकडा सांगितला होता. अर्थात त्याला राजकीय किनार होती. पण योगायोगाने (?) ती खरी ठरली.

मुखर्जी यांनी सरकारची बाजू मांडताना सांगि तले होते, की डाव्या पक्षांच्या ६१ सदस्यांनी पाठिंबा काञून घेतल्यानंतर सरकारकडे २३७ सदस्यांचा पाठिंबा उरला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या ३९ सदस्यांनी पाठिंबा देऊ केला. याचा अर्थ सरकारकडे २७६ सदस्यांचा पाठिंबा आहे.

प्रत्यक्षात सरकारच्या बाजूने २७५ मते पडली. मग एक मत गेले कुठे? अर्थात ते सभापती सोमनाथ चटर्जी यांचे होते. प्रथेप्रमाणे अध्यक्ष सरकारच्या बाजूने मतदान करतात.