शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (16:47 IST)

बाप्परे, कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर

भारतासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आता कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर तर ब्राझिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. काळजीची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
 
खरंतर चौथ्या स्थानी रशिया होता. तिथे 10 लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. मात्र आता रशियापेक्षा जास्त कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आता 10 लाख 77 हजार 374 कोरोनाबाधित आहेत. त्यपैकी 7 लाख 55 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 91 हजार 256 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने 29 हजार 894 बळी घेतले आहेत.
 
देशभरात आतापर्यंत 80 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून बाधितांचा आकडा 50 लाखांच्या घरात पोहोचला आहे. देशात मागील 24 तासात 83 हजार 809 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 24 तास 1054 जणांचा मृत्यू झाला. देशात 2 सप्टेंबरपासून दररोजचा कोरोनाबळींचा आकडा एक हजारापेक्षा जास्त आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 79 हजार 292 रुग्ण बरे देखील झाले आहेत.