शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (16:07 IST)

'ज्युबी-आर' नावाने रेमडेसिवीर जेनेरिक औषध बाजारात आले

भारतातील औषध उत्पादक कंपनी ज्युबिलंट लाइफ सायन्सेसने करोना महामारीवर उपचार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्युबिलंट जेनेरिकने भारतीय बाजारात ज्युबी-आर या ब्रँड नावाने रेमडेसिवीर बाजारात आणलं आहे. रेमडेसिवीर हे अमेरिकन औषध निर्माता कंपनी Gilead सायन्सेसचे अँटी-व्हायरल औषध आहे. भारतीय बाजारात त्याची किंमत प्रति वायल ४ हजार ७०० रुपये निश्चित केली गेली आहे. एक वायल १०० मिलीग्रामची असते. सध्या भारतीय कंपन्यांसह अन्य कंपन्यादेखील करोनावरील लस विकसित करत आहेत.
 
ज्युबिलंट जेनेरिका हे औषध वितरण जाळ्याद्वारे करोनावर उपचार करणार्‍या भारतातील १ हजारांहून अधिक रुग्णालयांना हे औषध उपलब्ध करुन देईल. २० जुलै रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DGCI) भारतामध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठी १०० मिलिग्राम औषधाच्या वापरास परवानगी देण्यात आली होती.
 
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून करोनाचं औषध लाँच करण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती ज्युबिलंट लाईफ सायन्सेसकडून देण्यात आली होती. या औषधामध्ये जगभरातील रुग्णांचे प्राण वाचवण्याची क्षमता असल्याचं मत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी एस. भरतीया यांनी सांगितलं होतं.