शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (16:48 IST)

नोवावॅक्सकडून कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा

अमेरिकेतील एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस संक्रमणावर औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. या औषधांची मनुष्य चाचणी केल्याची घोषणा कंपनीने केली आहे. बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोवावॅक्सचे प्रमुख संशोधक डॉ. ग्रिगोरी ग्लेनने सांगितलं की, कंपनी पहिल्या चरणात परीक्षण सुरू केलं आहे. ज्यामध्ये मेल्बर्न आणि ब्रिस्बेन शहरात १३१ स्वयंसेविकांवर या औषधाचं परीक्षण केलं आहे. 
 
ग्लेनने 'नोवावॅक्स'मध्ये मेरीलँडमधील मुख्यालयात ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्ही औषधांसोबत लस देखील शोधत आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत औषध आणि लस दोन्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
चीन, अमेरिका आणि यूरोपमध्ये जवळपास १२ औषधांच परीक्षण केलं जाणार आहे. यामधील कोणती औषध योग्य आहेत. याबाबत अजून संशोधन सुरू आहे. सगळ्या औषधांचा परिणाम हा वेगवेगळा होत आहे. 
 
नोवावॅक्स यांनी गेल्या महिन्यात असा दावा केला आहे की, आम्ही व्हायरसला हात देखील लावत नाही. मात्र हा रोग कोणत्या प्रतिरोधक क्षमता असलेल्या व्हायरस असल्याप्रमाणे कळत आहे.