testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीलंकेवर विजय मिळवूण दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये

SA won
सिडनी| Last Modified बुधवार, 18 मार्च 2015 (16:20 IST)
दक्षिण आफ्रिकाने सिडनी क्रिकेट मैदानावर आज (बुधवार) खेळण्यात आलेल्या पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंकेला 9 विकेटाने पराभूत करून विश्व कप 2015च्या सेमीफायनलमध्ये जागा बनवली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेची सुरुवात निराशाजनक झाली. डेल स्टेन व केली एबोट या वेगवान गोलंदाजांनी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान व कुशल परेरा या जोडीला अवघ्या ४ धावांवर तंबूत पाठवले. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चार शतकं ठोकणा-या कुमार संगकाराने
लाहिरु थिरीमानेच्या सोबत लंकेचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र लाहिरु ४१ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर एकाही फलंदाजाने संगकाराला साथ दिली नाही. महेल जयवर्धने, कर्णधार अँजेलो मॅत्यूज ,थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा हे सर्वजण झटपट तंबूत परतले. संगकारा ४५ धावांवर असताना बाद झाला. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जे पी ड्यूमिनी व इम्रान ताहिरया फिरकी गोलंदाजांसमोर लंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. ड्यूमिनीने तीन तर ताहिरने चार विकेट घेतल्या.

श्रीलंकेचे माफक आव्हान घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर हाशीम आमला १६ धावांवर बाद झाला. त्यावेळी आफ्रिकेची स्थिती ६.४ षटकांत ४० अशी होती. यानंतर क्विंटन डीकॉकची ५७ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी आणि फॅफ डू प्लेसिसची २१ धावांच्या खेळीने आफ्रिकेने सहज विजय मिळवला. श्रीलंकेचे आधारस्तंभ कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या दोघांचा हा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना ठरला. यानंतर दोघांनी एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारली आहे. आपल्या महत्त्वाच्या शिलेदारांना गोड निरोप देण्यात लंकेचा संघ पूर्णतः अपयशी ठरला.
श्रीलंकेने सहामधून चार सामने जिंकले होते आणि दो सामन्यात त्याचा पराभव झाला होता. दूसरीकडे, द. आफ्रीकाने देखील सहापैकी चार सामने जिंकले होते. दोनमध्ये त्याला पराजयाचा सामना करावा लागला होता. पूल-एमध्ये न्यूझीलंड 12 अंक घेऊन पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया नऊ अंकांवर दुसर्‍या स्थानावर होते. पूल-बीमध्ये भारताने आपले सर्व सहा सामने जिंकून पहिला स्थान प्राप्त केला होता.


यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...