गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2015 (15:28 IST)

मोदींनी ट्विटरवर टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 क्रिकेट विश्वचषक सुरू होण्या अगोदर टीम इंडियाला ट्विटरच्या माध्यमाने शुभेच्छा दिल्या.  पंतप्रधान मोदी यांनी विश्वचषकाच्या ओपनिंग सेरेमनी नंतर ट्विट करणे सुरू केले आहे. त्यांनी एकाच वेळेच बरेच ट्विट केले आहे ते बघूया.  

धोनी साठी मोदी यांचे ट्विट - कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीला माझ्याकडून शुभेच्छा. शानदार नेतृत्व कर आणि भारताला तुझा अभिमान वाटू दे अशी खेळी खेळ. मी तुला ओळखतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू असच करशील.  
 
विराट कोहलीसाठी मोदी यांचे संदेश - मी आपल्या देशातील उपकर्णधार विराट कोहलीला येणार्‍या टूर्नामेंटसाठी शुभेच्छा देतो. संपूर्ण देशाला त्याच्याकडून फार उमेद आहे.  
 
शिखर धवनसाठी मोदी यांचे ट्विट - शिखर धवनला शुभेच्छा. भारताला शानदार सुरुवात दे. तू जेव्हा पिचवर येशील तेव्हा फार फार धावा काढ. आम्ही सर्वजण तुम्हाला चियर करू.  
 
रोहित शर्मासाठी मोदी यांचे ट्विट - एकमात्र फलंदाज ज्याने वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक काढले आहे. तुझी फलंदाजीचे लाखो प्रशंसक आहे, आम्हाला परत एकदा गौरववितं कर.  
 
रहाणेसाठी मोदी यांचे ट्विट - मी आपल्या सर्वात युवा मित्राला शुभेच्छा देतो. तुझ्यासाठी विश्व कप उत्तम असावा. या मोक्याचा पूर्ण फायदा उचल.  

सुरेश रैनासाठी मोदी यांचे ट्विट - सुरेश रैना नेहमी मैदानावर चुस्त राहतो. यंदा बाउंसरला सामील करून चेंडू मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करशील.  
 
रायूडुसाठी मोदी यांचे ट्विट - अंबाती रायूडुला वर्ल्डकपसाठी फार फार शुभेच्छा. मला पूर्ण खात्री आहे की तू धावा काढशील आणि टूर्नामेंटमध्ये मुख्य भूमिका निभावशील.  
 
जडेजासाठी मोदींचे ट्विट - सर जडेजाचे कोण प्रसंशक नाही आहे? आम्हा सर्वांचे लक्ष्य तुझ्यावर आहे म्हणून तू चांगले प्रदर्शन करून भरताला विजय मिळवून दे.  
 
रविचंद्रन आश्विनासाठी मोदी यांचे ट्विट - मला पूर्ण खात्री आहे की तुझी फिरकी फलंदाजी सर्वांना आश्चर्यात टाकणार आहे आणि आम्ही नक्कीच जिंकू. चांगली खेळी खेळ अश्विन! माझी शुभेच्छा तुझ्या बरोबर आहे.  
 
पटेलसाठी मोदी यांचे ट्विट - युवा अक्षर पटेल फलंदाजाला आपल्या स्पिन आणि बाउंसमध्ये अडकवू शकतो. आपले सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न कर आणि कुठल्याही दबावाखाली खेळू नको.  
 
भुवनेश्वर कुमारासाठी मोदी यांचे ट्विट - भुवनेश्वर 'बेस्ट ऑफ लक'! प्रत्येक मॅच आपल्या पाल्यात टाकण्याच प्रयत्न कर. तू घेतलेले विकेटमुळे आम्ही अंदाजा लावून घेऊ की आम्ही किती लवकर सामना जिंकू शकतो.  
 
मोहित शर्मासाठी मोदींचे ट्विट - आमचे युवा जलद गतीचे गोलंदाज मोहित शर्मा उत्तम लेंथ आणि लाइनहून चेंडू फेकू शकतो. तो संघासाठी फार चांगला खेळाडू साबीत होणार आहे. बेस्ट ऑफ लक.  
 
मोहम्मद शमीसाठी मोदींचे ट्विट - मी आपल्या युवा आणि प्रतिभाशाली मित्राला शुभेच्छा देतो. मोहम्मद शमी विश्व कपासाठी सर्वात उत्तम खेळाडू आहे. चांगली खेळी खेळ आणि लवकर व जास्त विकेट घे.  
 
बिन्नीसाठी मोदी यांचे ट्विट - स्टुअर्ट बिन्नीच्या मागील प्रदर्शनामुळे सर्वच प्रभावित झाले आहे. आम्ही त्याला विश्व कपासाठी शुभेच्छा देत आहे.