शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

अ‍ॅलन बॉर्डर

पूर्ण नाव : अ‍ॅलन रॉबर्ट बॉर्डर
जन्म : २७ जुलै १९५५
ठिकाण : सिडनी
देश : ऑस्ट्रेलिया
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, मेलबोर्न १९७८
वन डे पदार्पण : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, सिडनी १९७९
शैली : डावखुरा फलंदाज व फिरकी गोलंदाज

कसोटीत ११ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा किकेट जगतातील पहिला खेळाडू. ऑस्ट्रेलियाच्या या महान क्रिकेयपटूने त्याच्या काळात अनेक विक्रम केले. सर्वांत जास्त कसोटी सामन्यात (93) कर्णधार बनण्याचा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे.

१९८१ मध्ये झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5-0 ने पराभव केला होता. त्यात बॉर्डरची मह्त्वाची भूमिका होती. तसेच १९८७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत व अ‍ॅशेस मालिकेच्या वेळी तो कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला. दोन्ही डावात दीडशे धावा करण्याचा त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

पुरस्कार-
विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू १९८२
हॉल ऑफ फेम २०००

कसोटी
सामने - १५६
धावा - १११७४
सरासरी - ५०.५६
सर्वोत्तम - २०५
१००/५० - २७/६३
बळी - 39
सर्वोत्तम - ७-४६
झेल - १५६

वन डे
सामने - २७३
धावा - ६५२४
सरासरी - ३०.६२
सर्वोत्तम - १२७
१००/५० - ३-३९
बळी - ७३
सर्वोत्तम - ३-२०
झेल - १२७