गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By राकेश रासकर|

सौरभ गांगुली

नाव : सौरभ चंडिदास गांगुली
जन्म : ८ जुलै १९७२
ठिकाण : कोलकता
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि. इंग्लंड, लॉर्डस, १९९२
वन डे पदार्पण : भारत वि. वेस्ट इंडीज, ब्रिस्बेन, १९९२
शैली : डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज

सौरभ गांगुली क्रिकेटमधील दादा फलंदाज मानला जातो. भारताचा तो सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. २००३ च्या विश्वकरंडकात त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. त्याने 'टीम इंडिया'ला अनेक देदीप्यमान विजय मिळवून दिले.

आक्रमक फलंदाजी हे त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य. बेंगॉल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकता, महाराजा व दादा या नावानेही त्याला संबोधले जाते. १९९६ मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डसवर त्याने पदार्पणातल्या कसोटी शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातला तो केवळ तिसरा खेळाडू आहे. त्यानंतरच्या कसोटीतही त्याने शतक ठोकले होते.

ऑफ साइडचा बादशहा म्हणून तो ओळखला जातो. १९९९ च्या विश्वकरंडकात श्रीलंकेविरूध्द त्याने १८३ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर एकाच वर्षांत तो कर्णधार बनला.

विश्वकरंडकानंतर त्याने ऑस्ट्रेलियात व पाकिस्तानात भारतीय संघाला यश मिळवून दिले. सलग आठ विजय त्याने भारताला मिळवून दिले. कर्णधार म्हणून आक्रमक कामगिरी करत असताना त्याच्या स्वतःच्या खेळावर मात्र विपरीत परिणाम झाला. त्यातच ग्रेग चॅपेल प्रशिक्षकपदी आल्यानंतर त्यांच्याशीही त्याचे वाद झाले. यातून त्याला संघातील स्थानही गमवावे लागले. पण त्यानंतर तो पुन्हा संघात परतणार की नाही अशी स्थिती असताना त्याने यशस्वी पुनरागमन केले. आपला जुना फॉर्म कायम असल्याचे त्याने त्यानंतरच्या फलंदाजीत दाखवून दिले.

सौरभ कर्णधार असताना भारताने विक्रमी २१ कसोटी सामने जिंकले आहेत. ४९ कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. वन डेत १० हजार धावांचा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय आहे. त्याआधी हा टप्पा सचिन तेंडूलकर व सुनील गावसकर यांनी गाठला आहे.

कसोट
सामने - ९१
धावा - ५४३५
सरासरी - ४०.८६
सर्वोत्तम - १७३
१००/५० - २७/१२
बळी - २६
सर्वोत्तम - ३-२८
झेल - ६२

वन डे
सामने - २८९
धावा - १०६३२
सरासरी - ४१.३६
सर्वोत्तम - १८३
१००/५० - २२/६६
बळी - ९५
सर्वोत्तम - ५/१६
झेल - ९८