testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

समर्थांनी स्थापिलेले अकरा मारुती

swami samarth
१) शहापूर येथे सईबाईकरिता स्थापन केलेला मारुती

२) मसूर येथे इ.स. १६४५ च्या रामनवमी उत्सवापूर्वी स्थापलेला मारुती.
३) चाफळ येथील श्रीराममंदिरापुढील 'दासमारुती'

४) चाफळ येथील मंदिरामागील 'प्रतापमारुती'

५) उंब्रज येथील मारुती चाफळवरून सर्मथ नित्य स्नानास उंब्रज येथे कृष्णा नदीवर जात असत, तेथे कदाचित प्रसंगी त्यांना राहावे लागत
असे म्हणून तेथे मारुती स्थापन करून केशव गोसावी यास ठेवले होते.
६) शिराळ्य़ाचा मारुती शिराळा येथील देशपांडे मंडळींनी सर्मथांचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या विनंतीवरून मारुतीची स्थापना झाली.

७) 'मनपाडले' व

८) 'पारगाव' येथील शिष्यांच्या आग्रहावरून दोन मारुतीची स्थापना झाली.

९) माजगावचा मारुती चाफळवरून उंब्रजला जाताना पूर्वेस दीड मैलावर माजगाव आहे. तेथील शिवेवर मोठा दगड होता. लोकं त्याचीच पूजाकरीत असत. त्याच दगडावर रेखीव मूर्ती करून सर्मथांनी मारुतीची स्थापना केली.

१0) शिंगणबाडीचा मारुती चाफळवरून अर्धामैलावर शिंगणवाडी गाव आहे. तेथे सर्मथ स्नानसंध्या करण्यास जात असत. तेथील टेकडीवर लहान गोजिर्‍या मारुतीची व छ. शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट झाली होती आणि तेथेच सर्मथांनी राजांना अनुग्रह दिला, म्हणून या मारुतीला विशेष महत्त्व आहे.

११) बाहे येथील मारुती हा बोरगावनजीक कृष्ण नदीच्या बेटामध्ये श्रीसर्मथ स्थापित अकरावा मारुती आहे. या ठिकाणास 'बहुक्षेत्र' असे
म्हणतात.

अशा स्वामी सर्मथ महात्म्यास व त्यांनी स्थापन केलेल्या मारुतीस कोटी कोटी प्रणाम..!ते सुप्रसिद्ध मारुती खालीलप्रमाणेसर्मथांनी स्थापिलेले अकरा मारुतीसर्मथ रामदास स्वामी यांना लोक मारुतीचा अवतार समजत असे. श्री सूर्यनारायणाने सूर्याजी पंतास वर दिला, तेव्हा दुसरा पुत्र मारुती अंशरूपाने होईल असे सांगितले. लहानपणी सर्मथ झाडाझाडावरून सहज लीलेने उड्या मारीत पुढे बाराव्या वर्षी सर्मथ 'सावधान' म्हणताच लग्नमंडपातून पळून गेले. तपश्‍चर्या व तीर्थयात्रा करीत ते आजन्म ब्रह्मचारी राहिलेत. त्यामुळे हनुमान अवतारात व सर्मथचरित्रात साम्य असल्याचे जनतेला आढळून आले. पुढेपुढे धर्मसंस्थापनेसाठी सर्मथांनी समाज संघटित करण्याचा जो प्रय▪केला, त्यात गावोगावी मारुतीचे मंदिर असावे, मारुतीचे अवतार असावे असे लोकांना वाटू लागल्यास आश्‍चर्य नाही.
सर्मथांनी अन्टेक मारुती स्थापन केले, परंतु इ.स. १६४४ ते इ.स. १६४८ पर्यंत त्यांनी दहा गावांमध्ये स्थापन केलेल्या अकरा मारुतीचीच
सुप्रसिद्ध म्हणून गणना केली जाते. सर्मथांना अकरा ह्या आकड्याचे विलक्षण आकर्षण होते. त्याचे रहस्य मारुतीच्या उपासनेमध्येच आहे.

मारुती हा अकरावा 'रुद्र' आहे. प्रसिद्ध अकरा मारुतींची गावे त्या काळी राजकारणास उपयुक्त होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांना'स्वराज्य स्थापनेच्या काळी' त्यांना विशेष महत्त्व आले होते.

सुधाकर के. तट्टे


यावर अधिक वाचा :

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

राशिभविष्य