- धर्म
» - सण-उत्सव
» - दत्त जयंती
दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणात्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणानेति नेति शब्दें न ये अनुमानासुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥१॥जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ताआरती ओंवाळितां हरली भवचिंता ॥धृ॥सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्तअभाग्यासी कैची कळेल ही मातपराहि परतलि तेथें कैचा हा हेतजन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥दत्त येऊनिया उभा ठाकलासद्भावे साष्टांगे प्रणिपात केलाप्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधलाजन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥'
दत्त दत्त' ऐसे लागले ध्यानहारपले मन झाले उन्मनमी-तुंपणाची झाली बोळवणएका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥