शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By वेबदुनिया|

श्री दत्तप्रभुची‍ भूपाळी

दत्तदिगंबरा, ऊठ करूणाकारा, पहाट झाली पुरे झोप आता
भक्तजन हे उभे वाट पाहती सभे दर्शने देई त्या शीर्घ शांता ।।धृ।।

अरुण तम दूर करी कुंकुमें नभ भरी बापडी ही उषा पदर पसरी
गंग खळखळ करी त्वद्यशें जगभरी मंद वाहे कशी अनिललहरी ।। दत्त 01 ।।

वनगंधर्व हे सुस्वरे गाइती मोर केकारवे नृत्य करिती‍
मुनिकुले गर्जती वेदमंथगिरा ऊठ बा श्रीधरा राधु पठती‍ ।।दत्त 02।।

षट्‍पदे पद्मदली गुंजती प्रियकरा भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली
रंग कष्टी उभा पाहू दे मुखप्रभा लोळू दे सतत बा चरणकमळी ।।दत्त 03।।