गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

अद्भुत आहे महालक्ष्मीचे हे 8 मंदिर

भारतात तसे तर हनुमान, शिव, कृष्ण आणि देवीचे मंदिर जास्त प्रमाणात आढळतात. विष्णू, राम, सरस्वती आणि लक्ष्मी देवीचे मंदिर फारच कमी बघायला मिळतात. जे काही आहे ते सर्व गुप्तकाल किंवा त्याच्या आधीचे बनलेले आहे.   
 
देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धी देणारी देवी मानण्यात येते. आम्ही तुम्हाला सांगत आहे की माता लक्ष्मीचे खास आणि प्रसिद्ध मंदिरांबद्दल. 
 
जेथे विष्णू विराजमान असतील तेथे लक्ष्मीतर राहीलच. आम्ही तुम्हाला अशा 10 मंदिरांची माहिती माहिती देत आहो ज्यांच्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.  
 
पुढील पानावर पहिले मंदिर ...

कोल्हापुराची अंबाबाई
 
कोल्हापुरात वसलेली श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. 
 
येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. कोंकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. 
 
कर्णदेवाने भोवतालाचे जंगल मोकळे केले. सतराव्या षटकांनंतर तत्कालीन अनेक बड्या व्यक्तींनी मंदिरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर हे महाराष्ट्राचे दैवत झाले. मंदिराच्या परिसरात जवळपास 35 लहान-मोठी मंदिरे व 20 दुकाने आहेत. वास्तुशास्त्रीय बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून मंदिरावर पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे. 
 
पुराणानुसार आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्त्व आहे. सहा शक्तिपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास माहात्म्य आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याची श्रद्धा आहे. 
 
श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. मूर्तीचे वजन साधारणतः चाळीस किलो आहे. देवीला चार भुजा आहेत. डोक्यावर मुकुट व शेषनाग आहे. बहुधा मंदिरांचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असते मात्र, येथील देवी पश्चिममुखी आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. वर्षातून मार्च व सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मिळ व लाभदायक मानण्यात येते. 
 
मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या मातेच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो. 
 
मंदिराच्या दैनंदिन विधीमधील आरती हा प्रमुख विधी आहे. रोज पाच वेळा आरती होते. पहाटे चारच्या सुमारास काकड आरती करण्यात येते. यावेळी भूप रागातील धार्मिक गीतगायन होते. मंगलारतीनंतर सकाळी आठच्या सुमारास महापूजा करण्यात येते. रोज रात्री दहाच्या सुमारास शेजारती होते. यावेळी गोड दुधाचा प्रसाद असतो. गाभार्‍यात आरती करण्यात येते व यावेळी देवीला निद्रा यावी म्हणून विशेष आराधना केली जाते. महाकाली, श्री यंत्र, महागणपती व महासरस्वती आरती व नैवेद्य दाखविण्यात येतो. मंदिर परिसरातील सर्व 87 मंदिरांना आरती ओवाळण्यात येते. 
 
करवीर क्षेत्रावर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद असून या नगरीला जगदंबा मातेने आपल्या उजव्या हातात धरल्याचे मानण्यात येते. त्यामुळे कोणत्याही प्रलयापासून ह्या नगरीचे संरक्षण होते, अशी श्रद्धा आहे. भोग आरतीच्या वेळेस मंदिरात प्रातःकाळी वैदिक मंत्रोच्चार होतो.
 
घंटानादानंतर आरती होते. शुक्रवारी सायंकाळी मातेस नैवेद्य दाखविण्यात येतो. नियमित आरत्यांव्यतिरिक्त रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळाष्टमी, किरणोत्सवाच्या प्रसंगीही विशेष आरतीचे आयोजन होते. श्री शंकराचार्य व श्रीमान छत्रपतीच्या भेटीप्रसंगीही विशेष आरती करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यात दिवाळीपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी हजारो भाविक उपस्थित राहतात. 
 
भारतातील महत्त्वाच्या शहरांशी हे शहर रेल्वे व रस्त्यांनी जोडले गेले आहे. शहरातून मंदिरापर्यंतही वाहतुकीची उत्तम व्यवस्था आहे.
 
पुढील पानावर दुसरे मंदिर ...

लक्ष्मीनारायण मंदिर  

लक्ष्मीनारायण मंदिराला मूल रूपात 1622मध्ये वीरसिंह देव यांनी बनवले होते, त्यानंतर पृथ्वीसिंहाने 1793मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करवला. त्यानंतर सन् 1938मध्ये भारताचे मोठे औद्योगिक परिवार बिडला समूहाने याचा विस्तार आणि पुनरुद्धार करवला त्यानंतर याचे नाव बिडला मंदिर पडले.  
 
विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित हे मंदिर दिल्लीच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. बिड़ला मंदिर जन्माष्टमीसाठी प्रसिद्ध आहे. सुंदर नक्षीने सजलेले या मंदिरची भव्यता पाहण्यासारखी आहे.  
 
पुढील पानावर तिसरे मंदिर ...

मुंबईचे महालक्ष्मी मंदिर
 
मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी बी. ए. देसाई मार्गावर हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.  
 
महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत.  
 
मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे. इंग्रजांनी महालक्ष्मी भाग वरळी क्षेत्राची योजना आखली होती. त्यासाठी ब्रीच कॅंडी मार्ग बनविण्यात येणार होता. पण समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत होते. त्यावेळी देवीने एक ठेकेदार रामजी शिवाजीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि समुद्रातून देवीच्या तीन मूर्ती काढून त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा आदेश दिला. 
 
रामजीने तसेच केले आणि त्यानंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला. मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी 
सुशोभित केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे. 
 
कसे जाल? 
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागातून येथे येण्यास रेल्वे, रस्ता व हवाई मार्गाने सेवा उपलब्ध आहे.
 
पुढील पानावर चौथे मंदिर ...

तिरूचनूरची पद्मावती देवी
 
तिरूचनूर हे तिरूपती जवळील एक लहानसे गाव आहे. या छोट्याशा गावात देवी पद्मावतीचे सुंदर मंदिर आहे. पद्मावती देवी अतिशय दयाळू आहे. तिला शरण गेल्यास आपली सगळी पापे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्‍दा आहे. तिरूपती बालाजीच्या मंदिरात मागितलेली इच्छा पद्मावती देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतरच पूर्ण होते अशीही समजूत आहे. तिरूपतीपासून हे मंदिर अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. 
 
मंदिराचा इतिहास 
तिरूचनूर गावातील हे मंदिर प्राचीन असल्याचे मानले जाते. तिरूपतीतील वेंकटेश्वराचे मूळ मंदिर येथेच होते, असे सांगितले जाते. पण येथील जागा कमी पडू लागल्याने मंदिर तिरूपतीत स्थलांतरित करण्यात आले. दोन महत्त्वाचे पूजाविधी वगळता बाकीचे रीतिरिवाज तिरूपतीमध्येच पार पाडले जाऊ लागले. त्यामुळे तिरूचनूरचे महत्त्व थोडे उणावले. 
 
बाराव्या शतकात यादव राजांनी येथे कृष्ण-बलरामाचे सुंदर मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सुंदरा वरदराजाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि देवी पद्मावतीसाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले. पौराणिक कथेनुसार देवी पद्मावतींचा जन्म कमळाच्या फुलात झालेला असल्यामुळे मंदिर तलावात बांधण्यात आले.  
 
मंदिर परिसर
मंदिर परिसरात बर्‍याच देवी-देवतांची लहान-लहान मंदिरे आहेत. देवी पद्मावती व्यतिरिक्त कृष्ण-बलराम, सुंदरराजा स्वामी आणि सूर्यनारायण मंदिरेही आहेत. पण प्रभू व्यंकटेशांची पत्नी असल्यामुळे देवी पद्मावती मंदिराला जास्त महत्त्व पद्मावती देवीची मूर्ती कमळाच्या आसनावर तिच्या वरील दोन्ही हातांमध्ये कमळाचे पुष्प आहे. 
 
कसे पोहोचाल?
मंदिर तिरूपती रेल्वे स्टेशनपासून पाच किलोमीटरवर आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिरापर्यंत 
पोहचण्यासाठी तिरूपतीहून बससेवा उपलब्ध आहे. हैदरापासून 547 किलोमीटर अंतरावर आहे. 
 
रेल्वेमार्ग: तिरूपती हैदराबादपासून 547 किलोमीटर अंतरावर असून तेथून रेल्वेसेवादेखील उपलब्ध आहे.
 
हवाईमार्ग: येथे हैदराबाद, चेन्नई, बंगलोर येथून विमानाने जाता येते.
 
पुढील पानावर पाचवे मंदिर...

इंदूरचे महालक्ष्मी मंदिर 

इंदूर शहराचे हृदयस्थळ राजवाड्याची शान असणार्‍या श्री महालक्ष्मी मंदिरच्या बाबतीत असे म्हटले जाते की या  
मंदिरचा निर्माण 1832 मध्ये मल्हारराव (द्वितीय) यांनी केला होता. 1933मध्ये आगीमुळे हे मंदिर उद्वव्स्त झाले होते. 1942मध्ये मंदिराचे पुनः जीर्णोद्धार करण्यात आले होते.  
 
वर्तमान सरकारी योजनेनुसार मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराच्या आधारावर या मंदिराचे जीर्णोद्धार करून याला भव्य रूप देण्यात येत आहे. रोज येथे हजारोच्या संख्येने भाविक प्रतिमेचे दर्शन घेतात. वर्तमानात महालक्ष्मी मंदिरात 15-20 लोक उभे राहू शकतात.  
 
होल्कर इतिहासाचे जाणकार गणेश मतकर यांचे म्हणणे आहे की मल्हारी मार्तंड मंदिरासोबत राजवाडा स्थित या प्राचीन महालक्ष्मी मंदिरात सुश्रृंगारित प्रतिमेचे फारच महत्त्व आहे.  
 
पुढील पानावर सहावे मंदिर ...

दक्षिण भारताचा स्वर्ण मंदिर

भारतीय राज्य तमिलनाडुच्या वेल्लू जिल्ह्यात स्थित थिरुमलई कोड गांव श्रीपुरममध्ये स्थित महालक्ष्मी मंदिराला 'दक्षिण भारताचे स्वर्ण मंदिर' म्हणतात. 100 एकर मध्ये पसरलेले हे मंदिर किमान 400 कोटी रुपयांनी बनले आहे.

या मंदिराला 24 ऑगस्ट 2007मध्ये जनतेसाठी उघडण्यात आले होते. चेन्नईहून 145 किलोमीटर दूर पलार नदीच्या किनारपट्टीवर वसलेले ही शांत आणि लहानशी जागा ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण मानण्यात आली आहे. 
पुढील पानावर सातवे मंदिर ...

 पद्मनाभस्वामी मंदिर  

थिरुवनंतपूरमचं हे पद्मनाभ मंदिर देशातलं नव्हे तर जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर आहे.  
 
पद्मनाभन मंदिर छोट्याशा केरळ राज्याच्या राजधानी असलेल्या थिरुवनंतपूरम एअरपोर्टपासून ३ किलो मीटरवर आहे. पूर्वी हे मंदिर शेषशायी विष्णूच्या मनमोहक रूपासाठी प्रसिद्ध होतचं.  
 
मंदिराच्या बांधकामाला 1566 साली सुरवात झाली. मार्तण्ड वर्मानं या राजानं हे मंदिर बांधलंय..100 फूट उंचीच्या मंदिराच्या गोपुराला सात मजले आहेत.  
 
हे एक विष्णूचे योगनिदेच्या रूपात असलेले मंदिर फार पुरातन आहे. या मंदिराचा सहाव्या ते नवव्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. हे एक वैष्णवांच्या पवित्र स्थानांपैकी महत्त्वाचे स्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अठराव्या शतकात झाला होता.
 
त्रावणकोरच्या राजांनी 1947पर्यंत राज्य केले. स्वतंत्रतेनंतर याला भारतात विलय करण्यात आले, पण पद्मनाभ स्वामी मंदिराला सरकारने आपल्या ताब्यात घेतले नाही. याला त्रावणकोरच्या शाही कुटुंबाजवळ राहू दिले, तेव्हापासून पद्मनाभ स्वामी मंदिराचे कार्यकाळ शाही कुटुंबाच्या अधीन एक प्रायवेट ट्रस्ट चालवत आहे.  
 
पुढील पानावर पहा आठवे मंदिर...

चौरासी मंदिर  

हे मंदिर हिमाचल प्रदेशच्या चंबापासून 65 किलोमीटरच्या अंतरावर भरमौर जिल्ह्यात स्थित आहे. येथे महालक्ष्मीसोबत गणेशजी आणि नरसिंह देवाच्या प्रतिमा आहेत. प्राकृतिक सौंदर्यात वसलेले हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीने फारच महत्त्वपूर्ण मानले जाते.  
 
तसेतर चंबामध्ये देखील लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. हे मंदिर पारंपरिक वास्तुकारी आणि मूर्तिकलेचा उत्कृष्ट उदाहरण आहे. चंबाच्या 6 प्रमुख मंदिरांमध्ये हे मंदिर सर्वात विशाल आणि प्राचीन आहे. विष्णूला समर्पित हे मंदिर राजा साहिल वर्मन यांनी 10व्या शताब्दीत बनवले होते. हे मंदिर शिखर शैलीने निर्मित आहे.