शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

तुळशी विवाह करण्याची पद्धत

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो. 
तुळशी व‍िवाह कसा करावा?
तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. 
मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे. 
गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. 
मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. 
यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. 
नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. 
नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. 
शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा. 
तुळशीचे महत्त्व 
तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे. 
पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. 
नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 
स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. 
तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते.
तुळशीपत्रांचा अर्क बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.