शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

तुळशी विवाह

तुळशी विवाह एका पुजोत्सव हरीविष्णूचा तुळशीशी विवाह लावणे असा याची विधी आहे. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन सारून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस व झेंडूची फुलांची झाडे उभी करतात. तुळशीच्या मुळाशी चिंचा व आवळे ठेवतात. तुळशी विवाह कार्तिकी एकादिवशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करावा त्यात उत्तरा भाद्रपद, रेवती व अश्विनी ही नक्षत्रे तुळशी विवाहाला श्रेष्ठ मानण्यात आले आहे.

कार्तिक शुद्ध द्वादशीस तुळशी विवाह झाल्या नंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांच समाप्ती करतात. व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग स्वत: सेवन करतात. तुळशी ‍ही घरोघरी असणारी एक अत्यंत पवित्र व उपयुक्त वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबीयांच्या घरासमोर वृंदावन असते. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात. तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला हिरप्रिया म्हणतात.

आरोग्य दृष्टाही तुळस मानवाला अतिशय उपायकारक ठरली आहे. तुळशीत कार्बोजिक अ‍ॅसिड वायू शोषून घेऊन ऑक्सीजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास उपयोग होतो. दारात तुळशीचे झाड असेल की, घरात पिसवा व हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करीत नाही. श्रीकृष्ण जीवनी, वृंदा, वृंदावती, श्रीदेवी, नंदिनी, लक्ष्मी, महालक्ष्मी अशी ही तुळशीचे नावे आहे. जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण अशी संत बहीणा बाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायली आहेत.