गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

दिवाळीत घरात सुगंधाचा वापर करा!

लिव्हिंग रूम
लिव्हिंग रूम म्हणजे आपल्या घराचा आरसा असतो. घर किती टापटीप आहे हे लिव्हिंग रूमवरून घरात येणार्‍या पाहुण्यांच्या चटकन लक्षात येतं. त्यामुळे 'रीड डिफ्युजर'लिव्हिंग रूमसाठी वापरणं जास्त सोईच ठरतं. त्याशिवाय हे डिफ्युजर इको फ्रेंडली, अग्निरोधक आणि मेंटेनन्स फ्री असतात. संत्र, ब्लॉसम, लव्हेंडर, लेमन ग्रास, मेलॉन मस्क अशा वेगवेगळ्या अरोमाजमध्ये ती उपलब्ध आहेत. मग आता या दिवाळीत सुंगधी मेणबत्त्या तुमच्या लिव्हिंग रूमच्या लूकमध्ये 'चा चाँद' लावतील.
 
 
बेडरू
बेडरूममध्ये आपण आपलं खासगी आयुष्य जगत असतो. त्यामुळे बेडरूम 'कम्फर्ट' महत्त्वाचा असतो. बेडरूमच्या ज्या भागात हवा खेळती राहत नाही, अशा कोंदट भागात 'व्हेपोरायझर'चा वापर करावा. एक बॉलमध्ये पाणी घेऊन त्यात व्हेपोरायझर तेलाचे थेंब टाकल्यास त्याचा 'माइल्ड फ्रेगरन्स' रूममध्ये नवचैतन्य टिकवून ठेवतो. सर्वसाधारणपणे महिला वर्गाला फुलांचा सुगंध जास्त आवडतो, त्यामुळे महिला वर्गाची आवड लक्षात घेऊन लीलॅक, फ्लोरल व्हॉलेट, जॅस्मीन हे फ्लेवर बाजारात मिळतात. त्याशिवाय फळांचा रस असलेल्या फ्लेव्हर्समध्येही वेपोरायझर्स उपलब्ध आहेत. त्यात विशेषत्वाने ब्लॅकबेरी सागा, सायट्रस क्रीम, मेलन मस्क, जिंजर प्लम, लाइम, किवी, पीच स्ट्रॉबेरी आणि बेरीज या फ्लेव्हरला मागणी जास्त आहे. यंदाच्या दिवाळीत तुम्ही बेडरुमच्या कपाटात पॉटप्युरीचा वापर केल्यास तुमचे नवीन कपडेही सुगंधीत बनतील.

बाथरूम 
सणासुदीच्या वेळेस घरात पाहुण्यांचे येणे जाणे सुरूच असते त्यासाठी अशा वेळेस बाथरूममध्ये सुगंधी मेणबत्त्यांचा वापर करावा. मात्र त्यासाठी वापरण्यात येणारा स्टँड योग्य ठिकाणी काळजीपूर्वक ठेवण्याची खबरदारी घ्यावी. थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर 'फ्रेगरन्स स्टोन्स'वापरावेत. विविध रंगांचे आणि आकाराचे हे स्टोन्स वापरल्यास छोट्याशा बाथरूमचा लूक ट्रेंडी होऊ शकतो. यात ग्रीन टी, लेमन ग्रास, मेलन मस्क, या नैसर्गिक सुगंधांमध्ये मेणबत्त्या उपलब्ध आहेत. दिसायला नाजूक असल्यामुळे या मेणबत्त्या तुम्ही गिफ्ट म्हणूनही एखाद्याला देऊ शकता.

स्वयंपाकघर 
स्वयंपाकघरामध्ये आईने दिवाळीचा काय फराळ तयाल केला आहे हे आप‍ण लिव्हिंग रूममध्ये बसूनही सांगू शकतो. मुद्दा हा की किचनमध्ये अनेक प्रकारच्या सुगंधांची मांदियाळीच असते, पण चिकन, मासे, कांदा, लसूण यांसारखे तिखट आणि उग्र पदार्थाचे वास आपल्या नाकाला नकोसे वाटतात. त्यामुळे चंदन, जाई जुई, गुलाबाच्या तेलाच्या कुपीसकट उपलब्ध असलेले पॉटप्युरी प्रकारातले दीर्घकाळ टिकणारे फ्रेगरन्स वापरणं सोईचं ठरतं. पॉटप्युरी फ्रेंगरन्समुळे स्वयंपाकघरामधील नको असलेली दुर्गंधी घालवता येतेच, पण त्याचबरोबर गृहिणींना जेवण बनवण्याचा उत्साहसुद्धा वाटतो. कोणत्याही फुलांचा सुगंध आपल्याला 'रोमँटीक' वातावरणात घेऊन जातो. तर चंदनाच्या सुगंधाने मन भक्तिमय होतं. त्यामुळे शेवटी एवढचं सांगावसं वाटतं यंदाच्या दिवळीत आपलं मन आणि घर उत्साहित ठेवण्यासाठी अशा सुगंधाचा वापर नक्की करा.