शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (14:17 IST)

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय

ज्योतिषाप्रमाणे दिवाळीच्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे कारण या रात्री लक्ष्मी भ्रमण करते. अमावस्या सारख्या काळ्या रात्री असुर शक्तींवर रामाच्या विजयाचे प्रतीक पर्वावर शुभ मुहूर्तात केले गेलेल्या कार्यांमध्ये यश मिळत आणि लक्ष्मी प्रसन्न होते. तर जाणून घ्या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय.  
 
दिवाळीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत अखंड दिवा लावावा. 
 
कमळ गट्ट्याच्या माळेने रात्री 'ॐ कमलायै नमः' या मंत्राच्या 41 माळांचा जप करावा.  
 
दिवाळीच्या दिवशी संयम बाळगून रात्री स्वच्छ निर्मळ वस्त्र घालून महालक्ष्मी स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, गोपाल सहस्रनामाचा पाठ करावा.  
 
लक्ष्मी पूजन करून तिजोरीत 5 कमल गट्टे, 1 हळकुंड, थोडे साबूत धणे, सुपारी, एक नाणं हे पूर्ण वर्षभर तिजोरीत ठेवावे.  
 
दिवाळीच्या रात्री सूर्योदयाअगोदर घराचा केर काढून सर्व कचरा बाहेर काढावा आणि घरात येणारी दरिद्री दूर करावी. हे कार्य अंधारात गुप्त रुपेण करावे.