मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

दिवाळीला काय कराल?

सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम आपल्या हातांचे दर्शन घ्या. यामुळे शुभ ऊर्जा मिळते. या दिवसांत घरात बनवलेल्या जेवणातील एक घास गाईला द्या.

WD
धनत्रयोदशीच्या दिवशी, घुबड राहत असणाऱ्या झाडाची फांदी आणा. ही फांदी आपल्या बसण्याच्या जागी ठेवा. लाभ होईल. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर दक्षिणावर्ती शंखावर अक्षता वाहा. या वेळी लक्ष्मी मंत्राचा जप करून लाल गुलाबाच्या पाकळ्या वाहाव्या. समृद्धी मिळेल. लक्ष्मी किंवा इतर कोणत्याही देवीला लवंग अर्पण करा. दिवाळीनंतरही ही प्रथा चालू ठेवा. आर्थिक लाभ होईल.

मोतीशंखामध्ये गुलाबपाणी भरून रसराज पारद श्री यंत्राचा अभिषेक करा. यावेळी लक्ष्मी मंत्र किंवा श्रीसूक्ताचा जप करा.
धनत्रयोदशीच्या दिवशी पांढऱ्या पदार्थाचे दान करण्याने आर्थिक लाभ होईल. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात केर काढू नका. ते आर्थिक समृद्धीसाठी शुभ नाही.