शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

धनत्रयोदशी आणि दिवाळीला काय खरेदी कराल

धनत्रयोदशीच्या दिवशी कार घेणार असाल तर एक दिवस आधीच पूर्ण पैसे द्यावेत. धनत्रयोदशीच्या दिवशी पैसे देऊ नयेत. गाडीत चांदीचे नाणे, किंवा कोणत्याही धातूची मूर्ती (गणपती, लक्ष्मी, हनुमान) चांदीची असल्यास सर्वश्रेष्ठ ठेवावी. मूर्ती ठेवल्यावरच गाडी घरी घेऊन यावी. राहू काळात गाडी घरी आणू नये.

धनत्रयोदशीच्या दिवशी घरी दक्षिणावर्ती शंख आणावा. अतिशुभ मानले जाते. हा शंख लक्ष्मीच्या परिवारातील सदस्य मानला जातो.

धनत्रयोदशीच्या दिवशी कमलगट्टय़ाची माळ आणणं शुभ मानलं जातं.

WD
धनत्रयोदशीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केलेले पारद श्री यंत्र घरी आणावे. हे यंत्र आणणं सर्वोत्तम मानलं जातं. यामुळे धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात.

पांढर्‍या किंवा लाल रंगाच्या कपडय़ांची खरेदी शुभ मानली जाते.

तेल किंवा तेलाच्या वस्तू खरेदी करणं वर्जित नाही, पण शक्यतो ही खरेदी एक ते दोन दिवस आधी करावी.

गरज नसल्यास काळ्या रंगाची वस्तू खरेदी करू नये.
WD
सोन्याची किंवा चांदी वस्तूंची खरेदी करणं शुभ आहे. परंतु शुद्ध सोनं-चांदी खरेदी करावी. चांदी किंवा सोन्याच्या बिस्किटांची खरेदी उत्तम.

संपत्तीची खरेदी करणं शुभ मानलं जातं.

पांढर्‍या किंवा लाल रंगाच्या वस्तू लक्ष्मीला अधिक आकर्षित करतात.

धार्मिक साहित्य किंवा रूद्राक्षांच्या माळा खरेदी करणं शुभ आहे.

विद्येशी निगडीत म्हणजेच पुस्तके किंवा स्टेशनरी खरेदी करणं शुभ आहे.