गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दिवा लावा?

मेष : पूर्वेला उदय होणारी ही राशी आहे. या राशीच्या लोकांनी पूर्वेला लाल कापडावर पणती ठेवून दिवा लावावा.
 
वृषभ : ही शुक्राची रास आहे. दक्षिण दिशेला पांढ-या कापडावर दिवा लावा.
 
मिथुन : बुध ग्रहाच्या या राशीचा उदय पश्चिमेला होत असतो. पश्चिम दिशेस हिरव्या कापडावर दिवा लावा.
 
कर्क : या राशीच्या लोकांनी उत्तर दिशेस पांढ-या कपड्यावर दिवा लावावा.
 
सिंह : अग्नी तत्त्वाची ही रास आहे. ही रास पूर्वेकडे उगवते. त्यामुळे पूर्वेला लाल वस्त्रावर दिवा लावा.
 
कन्या : ही रास दक्षिण दिशेस उगवते. दक्षिण दिशेस हिरव्या कापडावर दिवा लावा.
 
तूळ : शुक्राची ही रास पश्चिम दिशेस उगवते. पश्चिम दिशेस पांढ-या कापडावर दिवा लावा.
 
वृश्चिक : मंगळ देवाची कृपा प्राप्त करण्यासाठीउत्तर दिशेस लाल कापडावर दिवा लावा.
 
धनु : बृहस्पती देवाच्या या राशीचे स्थान पूर्व दिशेस आहे. धनू राशीचे जातक पूर्व दिशेस पिवळ्या वस्त्रावर दिवा लावा. लक्ष्मी निश्चित प्रसन्न होईल.
 
मकर : मकर राशीचे जातक दक्षिण दिशेस काळ्या कपड्यावर दिवा प्रज्वलित करा.
 
कुंभ : कुंभ राशीचे स्थान पश्चिम दिशेस आहे. पश्चिम दिशेस दिवा लावा.
 
मीन : ही जल तत्तवांची राशी असल्यामुळे या राशीचे स्थान उत्तर दिशेस आहे. म्हणून उत्तर दिशेस वृहस्पती देवासाठी दीप लावा.