गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (10:29 IST)

Delhi Assembly Election 2020: दिल्लीत मतदानाला सुरुवात

जोरदार प्रचारानंतर आज अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून, 672 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार असून, ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील.
 
सकाळी 9.39 वा. अमित शाह यांचं मतदारांना आवाहन
 
दिल्लीला स्वच्छ हवा, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि प्रत्येक गरिबाला घर देऊन दूरोगामी विचार आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारं सरकारचं या शहराला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवू शकते.
 
मी दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की खोटं आणि व्होटबँकेच्या राजकारणापासून दिल्लीला मुक्त करण्यासाठी मतदान अवश्य करा.
Arvind kejriwal
कॅनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचा आशीर्वाद घेतला. देश आणि दिल्लीच्या विकासासाठी प्रार्थना केली. हनुमानजी म्हणाले, "चांगलं काम करत आहेस. अशीच जनतेची सेवा करत रहा. फळ माझ्यावर सोड. सगळं चांगलं होईल." अरविंद केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ते हनुमानाचे भक्त आहेत.

दिल्ली पोलीस, होमगार्ड सह सैनिक दल असे 75 हजारहून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर तर भाजपने फक्त 3 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाने तर खातंच उघडलं नव्हतं. दिल्ली विधानसभेची मुदत २२  फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.