Widgets Magazine
Widgets Magazine

मेथीचे शंकरपाळे

shankarpale
साहित्य: 1 कप गव्हाचे पिठ, 1/4 कप मैदा, 2 टिस्पून कसूरी मेथी, 2 चिमटी ओवा, चवीपुरते मिठ, तेल

कृती: गव्हाचे पिठ, मैदा आणि मिठ एकत्र करून घ्या. त्यात 1 टेबलस्पून गरम तेलाचे मोहन घाला. कसूरी मेथीची पावडर, ओवा घालून मिक्स करा. पाण्याने घट्ट भिजवून 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळी लाटून कातणाने शंकरपाळाच्या आकारात कापून घ्या. लगेच तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.


यावर अधिक वाचा :