शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

दिवाळी स्पेशल बेसन मावा बर्फी

साहित्य - 1 कप बेसन, 1/2 कप मावा, 1/2 कप कंडेन्‍स मिल्‍क, 1/4 कप पिठी साखर, 1 चमचा कतरलेले काजू, 2 चमचा तूप, 1 चमचा वेलची पूड.  
 
विधी - सर्वप्रथम कढईत तूप गरम करावे, त्यात काजूचे काप केलेले तुकडे घालून त्याला गोल्‍डन ब्राउन करावे व एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवावे. आता याच कढईत बेसन घालून चांगले परतून घ्यावे. नंतर बेसन पातेल्यात काढून थंड होण्यासाठी ठेवावे. जोपर्यंत बेसन थंड होत आहे तोपर्यंत तुम्ही माव्याला कढईत घालून 2-3 मिनिटापर्यंत गरम करावे व खली उतरवून बाजूला ठेवा. नंतर त्याच कढईत आता कंडेंस मिल्‍क आणि पिठी साखर घालून मिक्स करा. आता यात वेलची पूड, भाजलेले काजूचे तुकडे, बेसन व मावा घालून मिक्स करा. आता हलक्या हाताने मिश्रणाला हालवत राहा. जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा या मिश्रणाला तूप लागलेल्या ताटात पसरवून द्या. थोड्या वेळानंतर आपल्या आवडीच्या आकाराच्या वड्या कापा.