शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By वेबदुनिया|

दिवाळी स्पेशल मिक्स धान्यांच्या चकल्या

साहित्य : हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ, काळा मसाला, तेल. 

कृती : वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस तळून काढाव्यात.