शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

सरबतं बनवताना लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी...

ज्याचे सरबत बनवायचे त्याचा रस किंवा काढा १ वाटी, पाणी १ वाटी, साखर २ वाटी घ्यावी.
पाणी व साखर एकत्र करून उकळावं.
उकळी येऊन फेस शांत झाला व मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा.
त्यात आधी तयार करून ठेवलेला रस / काढा मिसळावा आणि ढवळावा.
नंतर हे मिश्रण गाळून स्वच्छ, कोरड्या बरणीत भरून ठेवावं. यालाच सरबताचं ‘कॉन्सन्ट्रेट’ म्हणतात.

WD
चंदनवाळा सरबत
घटक - चंदन पूड १0 ग्रॅम, वाळा पावडर १0 ग्रॅम, पाणी १00 मिली. साखर २00 ग्रॅम.
कृती - पाणी उकळल्यावर गॅस बंद करावा. उकळलेल्या पाण्यात चंदन व वाळा पावडर टाकून ते झाकून ठेवावं. दोन तासानं मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. नंतर ते गाळून घेऊन मोजावं. १ वाटीच्या मिश्रणास दोन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावं. पाणी व साखर एकत्र उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं.
उपयोग - दाहशामक, डोळ्यांची आग, लघवीची आग कमी करतं. सतत तहान लागणं, ज्वर यासारख्या उन्हाळ्यातील तक्रारीत उपयुक्त.