शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

द्राक्षांचे सरबत

- स्मिता

PR
लागणारे जिन्नस : 1 किलो काळे किंवा हिरवे द्राक्षं, 1 किलो साखर, 1 चमचा साईट्रिक ऍसिड, 1 चमचा गुलाब जल.

तयार करावयाची कृती : द्राक्षांच्या बिया काढून मिक्सरमधून फिरवून त्याचा रस काढून घ्या. नंतर साखरेचा दोन तारी पाक तयार करून घ्या. त्यात साईट्रिक ऍसिड टाकून गाळून घ्या.

साखरेच्या पाकात द्राक्षांचा तयार केलेला रस व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक मिनिट उकळवून घ्या. थंड करा. गुलाब जल घालून एका काचेच्या बरणीत भरून ठेवा.