गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By अभिनय कुलकर्णी|

ग्रहणात चांदीचे नाणे जवळ ठेवा !

NDND
आतापर्यंतचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण २२ जुलैला होते आहे. त्याच्या दुष्प्रभावापासून बचावासाठी ग्रहण काळात चांदीचे नाणे अथवा एखादी वस्तू आपल्याजवळ बाळगावी असा सल्ला गणेशाचार्य नागरजी महाराज यांनी दिला आहे.

२२ जुलैला श्रावण कृष्ण आमावस्येला ग्रस्तोदय सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण पुष्ट नक्षत्र व कर्क राशीतील चतुर्ग्रही योग (सूर्य, चंद्र, बुध केतू) यांच्यात होत आहे. सुरतवासी 3 मिनिट 14 सेकंदापर्यंत ग्रहण बघू शकतील. जवळजवळ त्याच वेळेला इंदूरचे (मध्य प्रदेशातील) लाखो लोक़ 3 मिनिट 5 सेकंदांपर्यंत हा सोहळा पाहू शकतील. भोपाळलाही पूर्ण ग्रहण 3 मिनिट 9 सेकंदासाठी बघता येईल. ते सकाळी 6.22 ला सुरू होईल. वाराणसी आणि पाटण्यातही ग्रहण अनुक्रमे 3मिनिट 7 सेकंद आणि 3 मिनिट 47 सेकंद पाहता येईल. पाटण्याजवळ ग्रहण चांगले दिसेल. कोलकत्यात 0.911 प्रभेचे आंशिक ग्रहण पाहता येईल.

चंद्राची राशी कर्क आणि शनिचे नक्षत्र पुष्य यामध्ये सूर्यग्रहण होणार असल्याने समुद्रात भूकंप, वादळ होण्याची शक्यता आहे. ग्रहणाचा सर्वांत जास्त परिणाम महिला व मुलांवर होईल. कर्क, मेष, सिंह, धनू या राशींसाठी ग्रहण चांगले नाही. वृषभ, कन्या, तूळ, कुंभ या राशींसाठी ते चांगले आहे. मिथून, वृश्चिक, मकर आणि मीन या राशींसाठी ग्रहण संमिश्र फळ देणारे असेल. म्हणूनच सर्व राशींच्या लोकांनी ग्रहणकाळात आपल्याजवळ चांदीचे नाणे वा एखादी वस्तू ठेवावी. ग्रहणकाळात काही शहरात पाऊस होण्याची शक्यता आहे. पण देशाच्या राजकारणासाठी हे ग्रहण चांगले नाही.

ग्रहण काळात एखादे रोप लावल्यास ते अनेक संकटांपासून बचाव करू शकते. या झाडाची पाने आगामी काळात येणार्‍या ग्रहणांत आपल्याजवळ बाळगल्यास ग्रहणांचा दुष्परिणाम टाळला जाईल.