मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By वेबदुनिया|

महामृत्यूंजय जप करा !

NDND
वर्षातील पहिले खग्रास सूर्यग्रहण 22 जुलै 2009 ला भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजून 53 मिनिट 09 सेकंदाने सुरू होईल. 7 वाजून 22 मिनिट 05 सेकंदाने ते सुटेल.

शनीचे नक्षत्र पुष्य तसेच कर्क राशीवर त्याचा परिणाम होईल. राशींवर ग्रहणचा शुभाशुभ प्रभाव पडत असतो. यावर विश्वास नसेल त्यांचाही विश्वास बसेल असे परिवर्तन या ग्रहणकाळात नक्की घडेल. सुर्य ग्रहणादरम्यान ग्रहांची स्थिती ठिक दिसत नाही. गुरु, मंगळ, शनी, सूर्य, बुध आदी ग्रह आपल्या शत्रु राशींच्या कक्षेत येतील. केवळ शुक्र स्वराशीस्थ आहे. ग्रहण कर्क राशीला अशुभ फळ देणारे ठरणार आहे. राशीवर ग्रहणाचा प्रभाव हा आगामी सहा महिन्यांपर्यंत पडत असतो. या काळात सावधगिरी बाळगणे अनिवार्य असते.

ग्रहण काळात अशुभ फळ देणार्‍या राशी असलेल्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे महामृत्युंजय मंत्र जप आपल्याला लाभदायी ठरू शकेल.