गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By वेबदुनिया|

सूर्यग्रहणाची शुटींग 'मिराज'द्वारे

शत्रुंच्‍या मनात धडकी भरविणा-या 'मिराज 2000' विमानाने सूर्यग्रहणाचे छायाचित्रण आणि व्‍हीडिओ शुटींग केली जाणार असून ग्रहणा दरम्‍यान सूर्याच्‍या बदलत्‍या स्थितिवर नजर ठेवली जाणार आहे. हे मिराज ग्वालियरवरून उडणार आहे.

येत्‍या 22 जुलै रोजी होणा-या शतकातील सर्वांत मोठ्या ग्रहणासाठी खगोल शास्‍त्रज्ञांनी तयारी पूर्ण केली आहे. सूर्यग्रहणा दरम्‍यान सूर्याच्‍या बदलत्‍या स्थितिला कॅमे-यांमध्‍ये कैद केले जाणार आहे. त्यासाठीच मिराज 2000 चा वापर केला जाईल.

वायुसेनेच्‍या नवी दिल्‍लीतील कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी टी. के. सिंघा यांनी दिलेल्‍या माहितीनुसार मिराजमध्‍ये पायटल आणि सहायक पायलट असतील. तर विमानात स्वयंचलित कॅमेरे लावले जाणार आहेत.