testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भांडेवाडीच्या धर्तीवर राज्यात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा विचार

news
नागपूर| Last Modified मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (17:19 IST)
- मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय
भांडेवाडी येथे उभारण्यात आलेला १३० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प हा एक पथदर्शी आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अभिनव प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शहरांत जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्याबाबत लवकरच सकारात्मक विचार केला जाईल असे मत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केले. क्षत्रिय यांनी भांडेवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पास नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
नाल्यातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून १२०० मिमी व्यासाच्या १९ किमी लांबीच्या पाईपलाईनद्वारे महानिर्मितीच्या कोराडी येथील ३x६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पात गेल्या चार महिन्यांपासून पाणी नेण्यात येत असून कोराडी येथे नव्याने उभारण्यात आलेला हा वीज प्रकल्प शुद्धीकरण केलेल्या पाण्यावर चालविण्यात येत आहे.
या प्रकल्पाची ९० दिवसांची प्राथमिक परिपूर्ती चाचणी सुरु झाली असून या प्रकल्पांतर्गत १३० एमएलडी पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे.

अशाप्रकारचे जलशुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रातील अन्य औष्णिक वीज केंद्रालगतच्या मोठ्या शहरांत राबवून, प्रक्रिया केलेले पाणी वीज प्रकल्पात घेण्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरु आहे. दरम्यान नांदेड जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी महानिर्मितीच्या
परळी औष्णिक वीज प्रकल्पात घेण्याची निविदा काढण्यात येत असल्याचे महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन माळी यांनी सांगितले. या वेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महानगर पालिकेचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, महानिर्मितीचे मुख्य अभियंता अनंत देवतारे यांच्यासह महानिर्मिती आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष

national news
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना सिडनी विमानतळावर करावा लागला. ...

भारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडले

national news
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा दुसरा डाव सुरु झाला. यावेळी रोहित शर्मा आणि शिखर ...

पुन्हा एकदा सोनं-चांदी महागले

national news
परदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...

मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार

national news
देशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...

दक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे ...

national news
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...

पुन्हा एकदा सोनं-चांदी महागले

national news
परदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...

मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार

national news
देशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...

दक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे ...

national news
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...

नोटीफिकेशन्स पाहा डेस्कटॉपवर

national news
व्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...