शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. इव्हेंट वार्ता
Written By वेबदुनिया|

दोन आठवड्यात विदर्भात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

- नितिन फलटणकर

केंद्र सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर अद्यापही पावसाने दिलेल्या दग्याने आणि सरकारची योजना शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचू न शकल्याने विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात विदर्भातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपली जिवनयात्रा संपवली आहे.

महादेव मंगू जाधव या शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने याला कंटाळून रिधोरा खंडोपंत येथील श्रीकृष्ण प्रधान या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशणं केले.

दुसरीकडे अमरावतीतील भारत ढकरे या शेतकऱ्यानेही कर्जाला आणि वीज वितरक कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

पावसाने उघडीप घेतल्याने आणि परिवाराचा खर्च सोसणे असाहाय्य झाल्याने वर्दा जिल्यातील शंकरराव मरस्काल्हे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

हंगाम सुरू झाल्यापासून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले असून, आता पर्यंत 35 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.