गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

मिश्र पिठांच्या वड्या

साहित्य : अर्धी वाटी प्रत्येकी राजगिरा व शिंगाडा पीठ, पाव वाटी साबूदाणा पीठ, दोन चमचे दुधाची पावडर, पाऊण वाटी गूळ, थोडेसे सुक्या अंजिराचे बारीक तुकडे, चमचाभर बेदाणे, वेलचीपूड, पाव वाटी साजूक तूप, आठ-दहा काजूंची पूड.

कृती : सर्वप्रथम पिठे कोरडी भाजावी. मग थोडे तूप घालून खमंग भाजावीत. गुळात थोडे तूप घालून कोमट करावे. वितळल्यावर खाली उतरवावे. मग त्यात भाजलेली पिठे व इतर साहित्य घालून हलवावे. शेवटी दुधाची पावडर घालून गोळा बनवावा. थाळ्याला तूप लावून त्यावर मिश्रण घालून थापावे. वड्या कापाव्यात, गार झाल्यावर काढाव्यात.