गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By
Last Updated : बुधवार, 16 एप्रिल 2014 (18:15 IST)

फेंगशुईनुसार जेवणाच्या टेबलाचे प्रतिबिंब पडणारा आरसा

भोजनगृहात ठेवलेला मोठा आरसा किंवा भिंतीवरील आरसा हा शक्तीचा अद्भुत स्त्रोत आहे, असे सिध्द झाले आहे. भोजनासाठी फेंगशुईचे भाग्य प्राप्त करण्याचा हा अत्यंत चांगला उपाय आहे. जेवणाच्या टेबलाचे प्रतिबिंब पडणारा आरसा हा टेबलावरील खाद्यपदार्थ द्विगुणित असण्याचा आभास निर्माण करतो. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या संपत्तीत किंवा संपन्नतेत थेट वृध्दी करत नसेल; परंतु ही व्यवस्था एक गोष्ट सुनिश्चीत करते की, अशा कुटुंबाला अन्नाची कमतरता कधीही भासत नाही. आपण भोजनगृहात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे चित्र लावू शकता किंवा ताज्या रसरशीत फळांनी भरलेला कटारा टेबलावर टेवू शकता. आपल्या घरातील रेफ्रिजरेटर नेहमी भरलेला असला पाहिजे. या सर्व बाबी ही आपल्या घरातील खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेची प्रतीके आहेत.


फेंगशुईच्या शास्त्रानुसार जेवणाच्या टेबलाजवळ आरसा असणे, हे सुचिन्ह मानले जाते. परंतु स्टोव्ह किंवा स्वयंपाकाच्या गॅसजवळ आरसा असणे हे दुश्चिन्ह आहे. अशा परिस्थीतीत आपणांस दुखापत होउ शकते किंवा आपले जीवन धोक्यात येऊ शकते. जेवणाच्या टेबलाचे प्रतिबिंब पड्णारा आरसा आपले सदभाग्य वृद्धिंगत करत असतो; तर स्टोव्ह अथवा स्वयंपाकाचा गॅस-सिलेंडर यांचे प्रतिबिंब पडणारा आरसा हा प्राणघातकही ठरु शकतो.