बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

घराचे प्रवेश दार आणि फेंगशुई

ND
जर तुमच्या घराचे किंवा कार्यालयाचे मुख्य दाराचे तोंड खाली दिलेल्या दिशांकडे असेल तर तुम्ही त्यात काही बदलावं करून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकता.

जर घराचे दार दक्षिणेकडे असेल तर तुम्ही याला मेहरून, पेल यलो किंवा वमिलियन रेडच्या शेड्‍सने पेंट करू शकता.

दाराच्या दोन्हीकडे हिरवे आणि लांब रोप लावू शकता, जे चुकीच्या दिशेने बनलेल्या दारांचा दोष दूर करण्यात मदत करतील.

मुख्य प्रवेश दार उत्तर दिशेकडे असेल तर सहा नळ्या असलेल्या धातूची बनलेली विंड चाइम लावायला पाहिजे. विंड चाइमच्या मंजुळ आवाजाने मुख्य दाराच्या आजूबाजूच्या दुष्प्रभाव दूर होतो.

उत्तर दिशेच्या दारासाठी पांढरे, पेल ब्लु किंवा हलके रंग उत्तम असतात.

मुख्य दाराचे तोंड जर पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेकडे असेल तर दाराच्या आत डावीकडे एका पसरट पॉटमध्ये पाणी घेऊन त्यात फुलं ठेवायला पाहिजे त्याने त्या दिशेला सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. तसे तर वास्तूच्या दृष्टीने पूर्व दिशा उत्तम असते.

मुख्य दाराचे तोंड जर पश्चिमेकडे असेल तर सूर्यास्तसमयी दुष्प्रभावांना दूर करण्यासाठी दाराजवळ ग्लास क्रिस्टल ठेवावे.

पश्चिमेकडील तोंड असणाऱ्या दाराकडे प्लॉट किंवा बाल्कनीच्या उत्तरपूर्वी क्षेत्रात तुळशी सारखे रोप ठेवल्याने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश होतो. याच प्रमाणे प्रवेश दारासमोर जर चमेलीचे वेल लावले तर त्याच्या सुवासाने प्रतिकूलता दूर होते.