बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

घरात कासव ठेवा आणि समृद्धी मिळवा!

ND
व्यक्तीच्या जीवनात कधीच एकसारखा वेळ राहत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त समृद्धी हवी आहे. फेंगशुईत समृद्धी आणि शांती म्हणजे कासव! कासवाचा इतिहास पाच हजार वर्ष जुना आहे. त्यात ईश्वराचा वास असतो.

चीनमध्ये प्रचलित एक अख्खायीकानुसार किमान पाच हजार वर्ष अगोदर जेव्हा शिया काव नावाचा व्यक्ती आपल्या साथीदारांसोबत शेतात खोदण्याचे काम करीत होता, तेव्हा खालून एक फार मोठा कासव बाहेर निघाला. तेव्हापासूनच चीनमध्ये अशी मान्यता आहे की यात देवाचा वास असतो. कारण त्याचे अचानक प्रकट होणे फारच शुभ आणि समृद्धिदायक मानण्यात येतो.

जास्तकरून घरात जीवित कासव ठेवणे शक्य नसते. म्हणून फेंगशुईत काच किंवा धातूने तयार केलेले कासव ठेवणे शुभ मानले जाते. या कासवाला पाण्याने भरलेल्या लहानशा वाडग्यात ठेवायला पाहिजे. घराच्या उत्तर दिशेत याला ठेवणे लाभदायक असतो. जर शयन कक्ष किंवा ड्राइंगरूममध्ये ठेवले तर त्याची पाठ नेहमी भिंतीकडे असायला पाहिजे. ज्याने घरात समृद्धी व शांती येते.