शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

घरात खुशहालीसाठी आणावे फेंगशुई

WD
फेंगशुईचा डबल हॅप्पीनेस सिंबल बेडरूममध्ये लावावा.
प्रेमाच्या प्रतीक एखाद्या प्रेमळ जोडप्याचे चित्र किंवा मूर्ती आपल्या बेडरूममध्ये ठेवावी.
प्रवेश दाराच्या भिंतीला लागून जर तुमचे बेड ठेवण्यात आले असतील तर ते ताबडतोब तेथून दूर करावे, नाहीतर संबंधांत कटुता येते.
जर संबंधांत कटुता आली असेल तर टेरोकोटाचे पॉटला दक्षिणे दिशेत ठेवल्याने पती-पत्नीच्या संबंधांत स्थिरता येते.

PR
वैवाहिक संबंधांना अधिक प्रेमळ बनवण्यासाठी!
दांपत्य संबंध अधिक प्रेमळ बनवण्यासाठी आपल्या पलंगाच्या खाली ज्याकडेला तुम्ही पाय ठेवता, तेथे क्रिस्टल बॉल ठेवावा.
दक्षिण-पश्चिम भागात नेहमी पृथ्वी किंवा अग्नीशी निगडित रंगांचा वापर करावा. पडदे, कुशन, खिडक्या इत्यादींमध्ये त्यांचा वापर करता येतो.
लाल रंग हा प्रेमाचा प्रतीक आहे. जर हा रंग जास्त गडद वाटत असेल तर तुम्ही याला गुलाबी करू शकता.
घरात प्रेम संबंध वाढवण्यासाठी घरातील दक्षिण-पश्चिम भागात कांच किंवा सिरॉमिक पॉटमध्ये लहान-लहान दगड किंवा क्रिस्टल घालून लाल रंगाच्या दोन मेणबत्त्या लावाव्या. याने सकारात्मक ऊर्जेचा प्रेवश होईल आणि तुमची जोडी सदैव खुशाल राहील.
जर तुम्हाला अस वाटत असेल की तुमच्या संबंधात नैराश्य येत आहे तर आपल्या खोलीत शंख किंवा शिंपले नक्की ठेवावे. याने संबंध नक्कीच मजबूत होण्यास मदत मिळते.
घरातील ईशान कोपर्‍याचे फारच महत्व असते. या दिशेत नवरा बायकोने एकत्र बसून पूजा करावी, ज्याने त्यांच्या मधील अहंकार मिटेल आणि त्यांच्या संबंधात मधुरता येईल.
जर तुम्हाला अस वाटत असेल की तुमच्या पार्टनर हाताबाहेर जात आहे तर त्याला उत्तर-पूर्व दिशेकडे झोपवाय ला पाहिजे.
गुरूवारी केळी किंवा पिंपळाच्या झाडावर दोघे मिळून जल चढवावे.
शुक्रवारी नवरा बायको एक मेकांना परफ्यूम गिफ्ट करावे.
शनिवारी जांभूळाच्या काडी बेडरूममध्ये ठेवल्याने संबंधात मधुरता येते.