मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|
Last Modified: शनिवार, 14 मे 2011 (17:22 IST)

घरात सुख-समृद्धी आणतात रोप!

ND
फेंगशुईनुसार स्वस्थ आणि सुंदर रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते. फेंगशुईत झाडांना 9 आधारभूत सुरक्षा सावधगिरीमधील एक मानण्यात आले आहे. म्हणून घरातील रिकाम्या जागेत रोप लावायला पाहिजे.

रोप कसे लावावे?

वर चढणारी वेल ज्याला क्लायमबर्स म्हणतात जसे - मनी प्लांटला कोपऱ्यात लावून त्या जागेची उदासीनता कमी करू शकता.

घरातील दक्षिण-पूर्वेतील कोपऱ्याला धन आणि समृद्धीचा कोपरा म्हणतात, म्हणून येथे चौरस पानांचे रोप लावायला पाहिजे.
वाळलेले किंवा मृत झालेल्या रोपांना लगेचच तेथून काढायला पाहिजे. यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.

घरातील समोरच्या भागात काटेरी किंवा या टोकदार पानांचे रोप नाही लावायला पाहिजे. हे रोप नकारात्मक ऊर्जेला सहयोग प्रदान करतात.

या लहान सहानं गोष्टींकडे लक्ष्य दिले तर तुम्ही निसर्गरम्य हिरवळ आणि सुखाचा अनुभव करू शकता. फक्त झाड-झुडपं आमच्या वातावरणाला शुद्ध करण्यास मदत करतात.