गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई आर्टीकल
Written By वेबदुनिया|

Fengshuie Tips : फेंगशुई व डायनिंग रूम

घरातील डायनिंग रूम जितकी मोठी व आरामदायी असली पाहिजे तितकीच ती आकर्षकही असली पाहिजे. कारण जेवणाइतकेच त्या खोलीतील वातावरणही प्रसन्न असणे आवश्यक असते.

फेंगशुईच्या मते जेवणाची खोली फक्त जेवणाची जागा न राहता कुटुंबासोबत चर्चा करण्याचीही जागा असते. त्याचप्रमाणे घरगुती समस्यांवर तोडगाही येथेच काढला जातो. कौटुंबिक संबंधांवरही या खोलीचा बराच प्रभाव पडतो.

फेंगशुईच्या सिध्दांतानुसार नेहमी घरातील सर्व सदस्यांसोबत जेवण केल्याने संपूर्ण कुटुंब प्रेमाचा व आनंदाचा अनुभव घेते. तसेच विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती येते. डायनिंग रूम एकदम प्रवेशद्वाराजवळ नको. ती स्वयंपाकघराला लागून हवी. प्रवेशद्वारातून डायनिंग रूम दिसली तर आलेले पाहुणे जेवण झाल्याबरोबर निघून जातील. शिवाय बाहेरच्यांना डायनिंगरूमध्ये काय चालले तेही दिसेल.

डायनिंग रूमचा दरवाज
डायनिंग रूमच्या दरवाजाच्या स्थितीवरही घरात येणार्‍या व्यक्तीची मानसिकता कळते. दरवाजा उत्तर-पूर्वेला असेल तर पाहुण्यांना उत्साह वाटतो. दक्षिण भाग सोडला तर बाकी सर्व दिशा डायनिंग रूमसाठी चांगल्या असतात. दक्षिण भाग शक्ती व प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे जेवण करणार्‍याला अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. शक्तीचा त्याच्यावर नको तो प्रभाव पडू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी त्याजागी वायू घंटी किंवा क्रिस्टल लावावे. म्हणजे हा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. डायनिंग रूमचा दरवाजा भिंतीच्या बाजूने उघडत असेल तर जेवणार्‍याला जबरदस्ती बसविल्यासारखे वाटते. यामुळे जेवताना त्याला उगाचच तणावाखाली असल्याचे वाटेत. ही समस्या सोडविण्यासाठी दरवाजासमोरील भिंतीवर एक आरसा लावावा.

डायनिंग रूमचे छप्प
डायनिंग रूमचे छप्पर जास्तीत जास्त उंच असावे. त्यामुळे व्यक्तीची समृध्दी दिसून येते. छप्पर खाली असेल तर जेवणार्‍यांना आरामात जेवण करता येत नाही. घाईघाईत जेवण होऊन त्याचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी छप्परापर्यंत भरपूर प्रकाश जाऊद्या.