गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By

'दिलवाले' बद्दल 15 रोचक तथ्य

* 'दिलवाले' सिनेमात 'शाहरूख- काजोल'ची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा दिसणार असून आजपर्यंत ही जोडी असलेला एकही सिनेमा फ्लॉप झालेला नाही.
 
'काजोल'चा पती 'अजय देवगण'देखील 'दिलवाले' शीर्षक असलेल्या एका सिनेमात काम करून चुकला आहे. ही 'दिलवाले' 1994 साली रिलीज झाली होती.
 
अशी चर्चा आहे की 'दिलवाले' सिनेमा 'चलती का नाम गाडी' आणि 'हम' यापासून प्रेरित आहे.
* 18 डिसेंबर रोजी 'दिलवाले' सिनेमासह संजय लीला भंसालीची 'बाजीराव मस्तानी' प्रदर्शित होत आहे. वर्ष 2015 ची ही सर्वात मोठी टक्कर असेल.

2007 मध्येदेखील शाहरूख आणि भंसालीच्या चित्रपटांमध्ये अशीच स्पर्धा होती. तेव्हा शाहरूखच्या 'ओम शांती ओम' पुढे भंसालीची 'सांवरिया' धप्पकन पडली होती.

'दिलवाले' रिलीजआधी नफ्यात आहे तरीही येथे प्रश्न शाहरूखच्या प्रतिष्ठेचा आहे. हे बघायचे आहे की हा सिनेमा तीनशे कोटीच्या क्लबमध्ये सामील होतो का नाही?
* जेव्हा वरूण धवनला या चित्रपटाची ऑफर आली तर तो स्तब्ध झाला होता. शाहरूख खानसोबत काम करायला मिळणार हा विचार करून तो फार खूश झाला असून जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली तेव्हा आनंदाच्या धक्क्यामुळे त्याच्या आईची दो मिनिटांसाठी वाचा गेली.

रेड चिलीज एंटरटेनमेंटने याचे म्युझिक राइट्स सोनीला रिकॉर्ड 19 कोटींमध्ये विकले आहेत.

शूटिंग दरम्यान शाहरूख सेटवर सायकलने फिरायचा. ही सायकल रोहित शेट्टीने शाहरुखला त्याच्या गुडघ्याची तक्रार दूर करण्यासाठी भेट म्हणून दिली होती.
* 'रंग दे तू मोहे'... च्या शूटिंगदरम्यान थंडीमुळे कलाकार निळे पडून गेले होते. शूटिंग संपल्याबरोबर त्यांनी एक ओव्हरकोट आणि तीन कांबळे ओढले.

'रंग दे तू मोहे'... ची शूटिंग एका तुटलेल्या विमानावर करण्यात आली आहे. शाहरुखने सांगितले की काही काळाआधी ह्या विमानाला समुद्राजवळ इमरजेंसी लँडिंग करावी लागली होती. तेव्हापासून ते विमान तिथेच आहे.

'रंग दे तू मोहे'... या गाण्यातील एक सीन डोंगराच्या टॉपवर शूट करण्यात आले आहे. याबाबत शाहरूख म्हणाला की तेव्हा आमचे पाय दोरीने बांधले होते.
* 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' यात शाहरूख- काजोलचा ट्रेनमधला सीन फार हिट झाला होता तसाच सीन 'दिलवाले'मध्ये पाहिला मिळणार आहे पण यात ट्रेनला विमानाने रिप्लेस करण्यात आले आहे.

'दिलवाले'चं पहिलं गाणं 18 नोव्हेंबर रोजी मराठा मंदिर येथे लाँच करण्यात आले. जिथे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' मागील 20 वर्षांपासून आजपर्यंत प्रदर्शित केली जात आहे.

रोहित शेट्टीचे चित्रपट म्हटले तर उडणार्‍या कार आल्याचं. या सिनेमातही हाय ऑक्टेन एक्शन बघायला मिळणार आहे. शाहरुखने हॉलिवूड चित्रपट फास्ट ऍड फ्यूरिअस आणि जेम्स बाँड सारखे ऍक्शन करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.