शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. आगामी चित्रपट
Written By
Last Updated : सोमवार, 5 जानेवारी 2015 (16:49 IST)

बॉलीवुड 2015 : नव्या वर्षातील आगामी चित्रपट

नव्या वर्षात अनेक चर्चेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रदर्शनापूर्वीच हवा निर्माण केलेल्या अशा काही आगामी चित्रपटांची ही माहिती.... 
तेवर 
अर्जन कपूर प्रथमच आपल्या वडिलांच्या म्हणजे बोनी कपूरच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबरोबर संजय कपूरही निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. 9 जानेवारीला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात अर्जुनबरोबर सोनाक्षी सिन्हा आहे. 

बेबी 
अक्षयकुमारच्या या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. 'स्पेशल 26' नंतर दिग्दर्शक नीरज पांडे आणि अक्षयकुमारची जोडी पुन्हा एकदा यानिमित्ताने एकत्र आली. 23 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 
 

फँटम 
दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माता साजिद नाडियादवाला या यशस्वी जोडीचा 'फँटम' नव्या वर्षात प्रदर्शित होत आहे. यामध्ये सैफ अली खान आणि कॅटरिना कैफ असून मुंबईतील 26-11च्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.

दिल धडकने दो 
झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, अनिल कपूर व फरहान अख्तर हे आहेत. 5 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 

बदलापूर 
आतापर्यंत रोमँटकि आणि चॉकलेटी बॉयच्या इेमचमध्ये दिसलेला वरुण धवन या चित्रपटातून आपली इमेज बदलत आहे. केवळ तीनच चित्रपटांनंतर असा चित्रपट करणे हे धाडसाचेच काम आहे. या चित्रपटाचा प्रोमो सलमान खानपासून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत अनेकांना आवडला. 

फॅन 
मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत आहे. आदित्य चोप्रा निर्माता असून, संगीत दिग्दर्शन ए. आर. रहमान यांचे आहे. 14 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

बजरंगी भाईजान 
कबीर काख दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व करिना कपूर आहेत. मात्र, त्याची आतापासूनच चर्चा आहे. 

प्रेम रतन धन पायो 
सलमान खान पुन्हा एकदा सूरज बडजात्याच्या चित्रपटात दिसणार आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या या चित्रपटात सलमानबरोबर सोनम कपूर आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, असे म्हटले जात आहे. 

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी 
यशराज बॅनरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे. 1943च्या काळातील कोलकात्याच्या पार्श्वभूमीवर हा डिटेक्टिव्ह चित्रपट आहे. सुशांत सिंह राजपूत शीर्षक भूमिकेत आहे. 
 

बॉम्बे वेल्वेट
 
अनुराग कश्यपच्या या चित्रपटात रणबीर कपूर व अनुष्का शर्मा आहेत. या चित्रपट गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता तो नव्या वर्षात 15 मे या दिवशी प्रदर्शित होईल.