शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (17:36 IST)

कलंक : स्ट्रॉंग क्लाइमॅक्स आणि स्टार्सची जोरदार कॅमेस्ट्री, पण चित्रपटाच्या लांबीने केलं निराश

* स्टार रेटिंग - 2.5/5
* स्टारकास्ट - माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू
* दिग्दर्शक - अभिषेक वर्मन
* निर्माता - करण जोहर, साजिद नडियादवाला, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता
* संगीत - प्रीतम, संचित बल्हारा, अंकित बल्हारा
* शैली - पिरियड ड्रामा
* कालावधी - 2 तास 50 मिनिटे
 
स्वातंत्र्यापूर्वीची वेळ, लाहोर जवळ वसलेलं हुस्नाबाद आणि जफर-रूपची प्रेम कथा. खरं तर विभाजनाच्या काही वर्षांपूर्वीच्या कथेवर आधारित आहे कलंक. देव म्हणजे आदित्य रॉय कपूरला कळतं की त्याची बायको रूपंच विवाहेतर संबंध आहे. अशा स्थितीत जफर आणि रूप यांचे प्रेम प्रकरण कुठपर्यंत पोहोचतं किंवा त्यांच्या प्रेमाला कलंक लागतो का?. अभिषेक वर्मनने हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
* कमजोर कथानक - यात दोन मत नाही की कलंकच्या जोरदार स्टारकास्टने आपली भूमिका बजावण्यासाठी फार परिश्रम केले नाही. आलिया आणि वरुणची कॅमेस्ट्री, संजयने आपल्या अटींवर चालणार्‍या चौधरीची भूमिका आणि बहार बेगम म्हणून माधुरीचे नृत्य कौशल्ये उत्कृष्ट आहे. तसेच, आदित्य रॉय कपूरने त्यांच्या अबोलका स्वभाव असलेल्या देवची भूमिका देखील उत्कृष्ट रूपाने बजावली आहे. पण कथा प्रेक्षकांना बर्‍याच जागेवर गुंतवून ठेवण्यात सक्षम ठरली नाही. चित्रपटाचे लांबी जास्त असणे देखील एक कारण असू शकते.  
 
* क्लाइमॅक्स आणि संगीताने हाताळले - कलंकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचा क्लाइमॅक्स. तर प्रीतम, अंकित-संचित यांच्या संगीतामुळे चित्रपट बघितल्यानंतर परतलेले प्रेक्षक पूर्णपणे कंटाळले नाही. तथापि बिनोद प्रधान यांच्या सिनेमॅटोग्राफीने काल्पनिक हुस्नाबादला अतिशय सुंदरपणे स्क्रीनवर सादर केले आहे. चित्रपटात रूप म्हणजे आलिया, ही माधुरीची शागिर्द आहे. तसेच आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त दोघे मिळून एक वृत्तपत्र काढतात. कुणाल खेमू, जफर म्हणजेच वरुण धवनचा मित्र बनला आहे पण कुणालचा ग्रे शेड रोल आहे.
 
* कलंकला ऑल इंडिया 4000 स्क्रीन आणि परदेशात सुमारे 1300 स्क्रीनवर रिलीज करण्यात आले आहे. अशा प्रकारे, चित्रपट सुमारे 5300 स्क्रीनवर रिलीज झाले आहे. कलंकची मेकिंग 150 कोटी रुपयांची आहे. चित्रपटाच्या ओपनिंगशी 18 कोटी कलेक्शनची आशा आहे. तसेच, पुढील नऊ दिवसांमध्ये हे आकडे मेंटेन असायला पाहिजे. तेव्हाच चित्रपट सिनेमागृहांमध्ये ब्रेक एवेन मिळवू शकेल.
 
* वरुण-आलिया एक्स फॅक्टरसह आकडेवारी - 
1. हे वरुण धवन आणि आलिया यांचे आतापर्यंतचे सर्वात जास्त स्क्रीनवर रिलीज झालेलं चित्रपट आहे. 
2. 2019चे आतापर्यंतचे सर्वात जास्त स्क्रीन नंबर असलेले चित्रपट.    
3. महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या सुट्टींचे फायदे चित्रपटाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला मिळू शकतात. 
4. वरुण-अलियाची पहिले चित्रपट 'स्टुडंट ऑफ द ईयर' होते. ते सात वर्षांपूर्वी, 1350 स्क्रीनवर दाखवण्यात आले होते. त्याची ओपनिंग 7 कोटी रुपयांएवढी झाली होती.
5. पाच वर्षांपूर्वी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि दोन वर्षांपूर्वी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' दोघांची जोडी पुन्हा एकत्र पाहिली गेली.