Widgets Magazine
Widgets Magazine

Fim Review : एकदा तरी पाहावा 'मॉम'

भारतीय चित्रपटांमध्ये आजवर आईच्य भोवती फिरणारी बरीच कथानकं साकारण्यात आली आहेत. ‍ विविध चित्रपटांतून हे 'आई' फॅक्टर प्रभावीपरे दाखवण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर आणखी एका चित्रपटाची भार पडली आहे. अभिनेत्री श्रीदेवीची मुख्य भूमिका असणार्‍या या चित्रपटातून या घटकावर पुन्हा नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे तो चित्रपट म्हणजे रवी उदयवार दिग्दर्शित 'मॉम'. चित्रपटाच्या सुरुवातीलाच शिक्षिकेच्या रूपातील देवकी (श्रीदेवी) प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपल्या मुलीप्रती तिची असलेली ओढ या दृश्यांतून चित्रपटाच्या सुरुवातीलाच सर्वांच्या लक्षात येते. पण, आर्याप्रती (सजल अली) तिचं प्रेम आणि आपुलकी असूनही, ती आपली सावत्र आई असल्याचं आर्या काही केल्या विसरत नाही. त्यामुळे आई - मुलीच्या नात्यात असलेली सहजताया चित्रपटात पहायला मिळत नाहीये. त्या दोघींचं नातं पाहता चित्रपटात एक वळण येतं आणि कथानकाला चालना मिळते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडींसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या आर्याचा बलात्कार होतो, तिचा शारीरिक छळ केला जातो. 
 
त्यानंतर कोर्टत सुरू असलेले खटले, दोषी असणार्‍यांचीही निर्दोष मुक्तता होणं आणि एका आईची आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्यावर अत्याचार करणार्‍यांना शिक्षा देण्यासाठीची तिची धडपड हे पुन्हा एकदा त्याच वळणावर जाताना दिसंत. या चित्रपटातून 'मॅथ्यू फ्रान्सिस' म्हणजेच अभिनेता अक्षय खन्ना आणि डिटेक्टीव्ह दयाशंकर कपूर म्हणजेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. आर्या नेमकी तिच्या आईचा म्हणजेच श्रीदेवीचा राग का करते, त्यांच्य नात्यात सहजता कधी येणार, आर्याला तिची चूक कळणार की नाही, तिच्यावर अत्याचार करणार्‍याचं काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. 'मॉम' या चित्रपटाचं कथानक पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर जाणारं वाटलं तरीही या चित्रपटाचं एकंदर सादरीकरण, पार्श्वसंगीत आणि कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शकाचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने ...

news

जॅकलीन फर्नांडीस झाली टॉपलेस

बॉलीवूड नायिका जॅकलीन फर्नांडीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. अलीकडेच ...

news

तब्बल 4 कोटीची गाडी रणवीरची वाढदिवसाची खरेदी

रणवीर सिंहचा 32 वा वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांची पांढऱ्या रंगाची एस्टन मार्टिन ...

news

'टॉयलेट' ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या “टॉयलेट, एक प्रेमकथा’ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप ...

Widgets Magazine