गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By

Movie Review : 'कबाली'

स्टार कास्ट : रजनीकांत, राधिका आपटे, धनशिका, विंस्टन चाओ, जॉन विजय, दिनेश रवी
डायरेक्टर : पीए रंजीत
प्रोड्यूसर :  कलईपुली एस. थानु
म्यूजिक : संतोष नारायणन
जॉनर ऍक्शन थ्रिलर
 
रजनीकांतचे मोस्ट अवेटेड चित्रपट 'कबाली' थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. कबाली अॅक्शन थ्रिलर मूवी आहे, ज्याला पीए रंजीत यांनी  डायरेक्ट केले आहे. चित्रपटात रजनीकांताची हिरॉईन राधिका आपटे आहे. रजनीकांत या चित्रपटात एकदा परत गरिबांचा देवता बनला आहे.  चित्रपटात मजुरांच्या समस्यांना फारच उत्तमरीत्या मांडण्यात आले आहे. चित्रपटाची शूटिंग मलेशियात झाली आहे आणि सुरुवातीत दाखवण्यात आले आहे की कशा प्रकारे रजनीकांत लोकांचा मसीहा बनतो.  
 
कथा ...
कबालीमध्ये रजनीकांताने एका सनकी गँगस्टर (कबाली)चा रोल केला आहे. कबाली 25 वर्षांपासून तुरुंगात राहिल्यानंतर मलेशियाच्या जेलमधून सुटतो. यानंतर तेथे राहणार्‍या इंडियंसच्या वेलफेयरसाठी संघर्ष करू लागतो. पण तेथे '43' नावाची गँग आहे जी मुलांकडून ड्रग्स सप्लाय करण्याशिवाय बरेच चुकीचे काम करवते. कबाली यांच्याविरुद्ध लढतो . आता बघायचे शेवटी कबाली जेलमध्ये का जातो आणि काय तो '43' गँगशी लढण्यात यशस्वी ठरतो का! यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागणार आहे.  
 
डायरेक्शन...
चित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये स्क्रीनप्ले थोडे कमजोर आहे, जे चित्रपटाला थोडे कमजोर करते. पण चित्रपटाची कथा आणि कॅमेरा शॉट्स चांगले आहे. चित्रपटात रजनीकांतच्या स्टाइलला दाखवणारी सिनेमेटोग्रॉफी आणि आर्टवर्क काबिल-ए-तारीफ आहे. चित्रपटाचे डायरेक्शन तेवढे शानदार नाही आहे पण सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी तर फक्त रजनीचे अॅक्शन बघण्यासारखे असते. डायरेक्टरने चित्रपटात त्या शॉट्सला फार महत्त्व दिले आहे जे सुपरस्टारच्या चाहत्यांना क्रेझी करून देतील.  
 
स्टारची परफॉर्मेंस...
चित्रपटात रजनीकांतने एकवेळा परत जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. अडीच तासाच्या चित्रपटात रजनी वेग वेगळ्या शेड्समध्ये दिसला आहे. मग त्याचा आशिकाना अंदाज असो किंवा एक सनकी गँगस्टरचा रोल. प्रत्येक भूमिकेला त्याने फारच उत्तमरीत्या साकारले आहे. तसेच राधिका आपटे देखील चित्रपटात आपल्या भूमिकेसोबत न्याय केला आहे. ऐकून सर्वांची अॅक्टिंग चांगली आहे. पण चित्रपट बघून आम्ही म्हणू शकतो की हे चित्रपट फक्त रजनीकांतासाठी बनले आहे.   
 
चित्रपटाचे म्युझिक ...
चित्रपटाचे म्युझिक छान आहे. यातील एक गीत 'निरुप्पा दा' आधीपासूनच म्युझिक चार्ट्सवर हिट झाले आहे. ओवरऑल चित्रपटाचे  बॅकग्राऊंड म्युझिक देखील शानदार आहे.   
 
बघावे की नाही ...
जर तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन असाल तर हे चित्रपट फक्त तुमच्यासाठीच आहे. विचार करू नका, फक्त थिएटरकडे आपले पाय वळवा. 
 
क्रिटिक रेटिंग 3 /5