गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2016 (16:37 IST)

Movie Review: 'की एंड का'

चित्रपट 'की एंड का' एक रोमँटिक-कॉमेडी आहे, ज्याला आर बाल्की यांनी डायरेक्ट केले आहे.  
 
'चीनी कम', 'पा' आणि 'शमिताभ' सारखे चित्रपटानंतर डायरेक्टर आर बाल्कीने एकदा परत 'की एंड का'च्या माध्यमाने 'स्लाइस ऑफ लाईफ' दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  

कथा ...
चित्रपटाची कथा कबीर (अर्जुन कपूर) आणि किआ (करीना कपूर खान) यांची आहे, ज्यांची भेट एका फ्लाईटमध्ये होते. ही भेट लवकरच प्रेमात बदलते आणि नंतर लग्नात, पण एका ट्विस्टसोबत. जेथे किआ एक वर्किंग वाइफ आहे तसेच कबीरला घरातील काम करणे पसंत आहे. कथा बर्‍याच ट्विस्ट आणि टर्न्ससोबत पुढे जाते. नवरा घरी आणि बायको कामावर जात असेल तर बरेच किस्से बनतात आणि हे सर्व घडूनही चित्रपट हॅप्पी नोटसोबत समाप्त होतो, ज्यासाठी तुम्हाला चित्रपट बघणे फारच गरजेचे आहे.  
 
चित्रपटाची स्क्रिप्ट ठीक ठाक आहे ज्याला अधिक उत्तम बनवू शकले असते. संपूर्ण चित्रपटादरम्यान तुम्ही स्वत:ला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करता पण त्यात काही तुम्ही यशस्वी होत नाही. इंटरवलनंतर कथेत थोडे ट्विस्ट येते, पण याचा शेवट एक टिपीकल हिंदी चित्रपटासारखा होतो. क्लायमॅक्सला अधिक चांगले बनू शकत होते. 
 
डायरेक्शन...
आर बाल्कीचे डायरेक्शन नॅचरल असत आणि जेव्हा त्यांच्यासोबत पी सी श्रीराम सारखा सिनेमेटोग्राफर असेल, तर विजुयलच्या बाबतीत चित्रपट आधीपासूनच रीच होऊन जात. ट्रेन यार्ड आणि अमिताभ बच्चनच्या सीक्वेंसमध्ये कमालीची सिनेमॅटोग्राफी बघायला मिळते.  
 
ऍक्टींग...
अर्जुनने चांगले काम केले आहे आणि त्याच्या वेग वेगळ्या इमोशंसला कॅमेर्‍यात सुंदररीत्या दाखवण्यात आले आहे. तसेच करीना कपूर खानने देखील चांगली अॅक्टिंग केली आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा कॉमियो अपीयरेंस एखाद्या ट्रीट सारखा आहे.  
 
म्युझिक...
चित्रपटात हनी सिंहचे सॉन्ग 'हाई हील' आधीपासूनच हिट होते, तसेच मिथुनचे 'जी हुजूरी' गीत ही चांगले आहे जे चित्रपटाच्या थीमसोबत मॅच करत आहे.  
 
बघावे की नाही ...
जर तुम्ही आर बाल्कीचे चित्रपट आणि अर्जुन-करीनाच्या अॅक्टिंगचे दीवाने असाल तर एकदा जरूर हे चित्रपट बघायला हरकत नाही.