शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (16:42 IST)

Movie Review: 'फैन'

Plot: मनीष शर्माने 'बैंड बाजा बारात' आणि 'शुद्ध देसी रोमांस' सारख्या चित्रपटांना डायरेक्ट केल्यानंतर आता शाहरुख खानसोबत 'फॅन' घेऊन आला आहे. चित्रपट सुपरस्टार आणि त्याच्या मोठ्या फॅनची कथा आहे.  
 
शाहरुख खान स्टारर 'फैन' सिनेमाघरांमध्ये रिलीज झाली आहे. कथा एक सुपरस्टार आणि त्याच्या मोठ्या फॅनची आहे.  
 
कथा :
स्वत:ला सुपरस्टार आर्यन खन्ना (शाहरुख खान)चा सर्वात मोठा फॅन सांगणारा गौरव चांदना (शाहरुख खान), दिल्लीत एक सायबर कॅफे चालवतो. गल्लीतले लोक त्याला ज्युनियर आर्यन खन्ना बोलवतात. गल्लीत झालेल्या एका कॉम्पिटिशनमध्ये तो आर्यन खन्नाची ऍक्ट करतो, ते जिंकल्यावर त्याला बक्षिसम्हणून 20 हजार रुपये मिळतात. त्या पैशांना घेऊन तो आर्यनच्या 48व्या बर्थडेवर तिकिट न घेता मुंबईत जातो. तो पालीच्या त्या होटलमध्ये थांबतो ज्यात पहिल्यांदा आर्यन खन्ना थांबला होता. पण या दरम्यान त्याची भेट आर्यनशी होत नाही.  
कथेत तेव्हा ट्विस्ट येत जेव्हा गौरव, आर्यनसाठी एक न्यू कमर ऍक्टर सिड कपूरला मारहाण करतो, त्याकडून जबरदस्ती सॉरी म्हणायला लावतो आणि या व्हिडिओला फेसबुकवर शेयर करून देतो. सर्वांना वाटू लागत की हा व्हिडिओ आर्यन खन्नाचा आहे, यामुळे तो मीडिया आणि फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनतो. आर्यनला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो गौरवला अरेस्ट करवून देतो. येथून सुरू होते एक सुपरस्टार आणि त्याच्या मोठ्या फॅनमध्ये जंग. या युद्धात कोणाची हार आणि कोणाचा विजय होतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे चित्रपट बघणे गरजेचे आहे.  
अॅक्टिंग
आर्यन खन्ना आणि गौरवचा रोल शाहरुखने फारच उत्तमरीत्या साकारला आहे. लुकपासून बोलण्याची विशिष्ट पद्धत फारच चांगल्या प्रकारे  शाहरुखने साकारली आहे. तसेच, बाकी स्टार्सने देखील कथेसोबत आपली भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे.  
डायरेक्शन
चित्रपटाचे डायरेक्शन छान आहे आणि वेग वेगळ्या जागेच्या लोकेशन्सवर काम केले आहे. मुंबई, क्रोएशिया, लंडन आणि दिल्लीत   चित्रवण्यात आलेल्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी देखील कमालीची आहे, ज्यासाठी मनू आनंद बढाईचे पात्र आहे. तसेच स्क्रीनप्लेपण कमालीचा आहे. पण चित्रपटाचा फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे , तर सेकेंड हाफ जास्त लांब वाटतो.  
म्युझिक  
चित्रपटाचे पहिले गीत 'जबरा फॅन' सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. पण हे गाणे चित्रपटात दाखवण्यात आले नाही. हे शाहरुखचे सॉन्गलैस चित्रपट आहे. याचा बॅकग्राऊंड स्कोरदेखील ठीक-ठाक आहे.  
बघावे की नाही ...?
चित्रपटाची कथा ट्रेलरपासूनच फार मनोरंजक वाटत होती आणि प्रेक्षकांना बांधून ठेवते. पण चित्रपटाचा सेकंड हाफ थोडा मोठा आहे, ज्यामुळे कथा लंडनहून मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचते. पण जर तुम्ही शाहरुख खानचे फॅन असाल तर हे चित्रपट जरूर बघा. 
रेटिंग : 3:5