शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (18:01 IST)

Movie Review : सस्पेंस थ्रिलर 'रुस्तम' बघा व्हिडिओ

स्टार कास्ट : अक्षय कुमार, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता, अर्जुन बाजवा, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा
दिग्दर्शक :  टीनू सुरेश देसाई
निर्माता : झी स्टुडियो, क्रियार्ज एंटरटेनमेंट, केप ऑफ गुड फिल्म्स, प्लान सी स्टुडियो, नीरज पांडे
संगीत :  आर्को प्रावो मुखर्जी, जीत गांगुली, अंकित तिवारी, राघव सच्चर
जॉनर मिस्ट्री थ्रिलर
 
टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित रुस्तम चित्रपटाचा प्लॉट शानदार आहे- एक नेव्ही ऑफिसर, त्याची विश्वासघाती पत्नी आणि पत्नीचा प्रियकर. ही कहाणी 1959च्या प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित आहे. ज्यात रुस्तम एक नेव्ही ऑफिसर आहे आणि तो आपले मिशन पूर्ण करून जेव्हा घरी परततो तेव्हा त्याला कळतं की आपल्या पत्नीचे विवाहबाह्य प्रकरण आहे. हे कळल्यावर तो पत्नीच्या प्रियकरावर गोळ्या झाडतो. हे कळल्यावर संपूर्ण देश त्याला खूनी मानतो पण दोषी नाही. का? हेच सिनेमातील सस्पेंस आहे. पण कदाचित सस्पेंस कळल्यावर निराशाच हाती लागणार आहे.

नेहमीप्रमाणे अक्षयने खूप छान काम केले आहे तर इलियान फक्त सुंदर दिसली आहे. ईशा गुप्ता विशेष प्रभाव जाणवला नाही. तसेच मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपली जागा निर्माण करणारे कलाकार सचिन खेडेकर आणि उषा नाडकर्णी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिनेमाचे डॉयलॉग्स हवे तेवढे प्रभावी नाही. म्हणून बर्‍याच वेळा सिनेमा रेंगाळत असल्याचे वाटतं. अक्षय देशभक्त या रूपात अनेकदा झलकला आहे त्यामुळे नवीनता म्हणून काही नाही. सिनेमाचा दुसरा भाग थोडा फिकट वाटतो. तरी अक्षयच्या अभिनयामुळे आणि सस्पेंस थ्रिलर असल्यामुळे हा सिनेमा न बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर इंजाय करा अक्षयचा सस्पेंस थ्रिलर रुस्तम. 
 
 

रेटिंग : 3/5