शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जुलै 2014 (12:28 IST)

चित्रपट परीक्षण : हेट स्टोरी 2

बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्री लि.
निर्माता : भूषण कुमार‍
निर्देशक : विशाल पंड्या
संगीत : मिथुन, रशीद खान, आर्को
कलाकार : सुशांत सिंह, सुरवीन चावला, जय भानुशाली, सनी लियोन (आइटम नंबर) 
 
अलीकडे चित्रपटात काहीतरी थ्रिल असावेच असा समज काही निर्माता-दिग्दर्शकांचा आहे. निर्माते विवेक भट्ट आणि भूषण कुमार यांनी यापूर्वीही असे प्रयत्न पडद्यावर केले आहेत.

विशाल पांडय़ा दिग्दर्शित ‘हेट स्टोरी 2’ हा ताजा चित्रपट असाच आहे. इरॉटिक थ्रीलर या प्रकारात मोडणारा हा चित्रपट प्रत्यक्षात काहीच परिणाम साधत नाही. कामुकतेच्या नादात कथा, पात्रे, पटकथा, लॉजिक, प्रसंग संगती आदी किमान बाबींकडे कानाडोळा झाला आहे. त्यामुळे ‘हेट स्टोरी 2’ हा ‘ब’ दर्जाचा वाटतो. यापेक्षा ‘हेट स्टोरी’ हा दोन वर्षापूर्वी आलेला चित्रपट बरा होता असे म्हणावे लागेल. कामुक, हाँटेट थ्रिलर हे विषय विक्रम भट्ट यांचे हुकमाचे एक्के. मात्र आता त्यात तोच तो पणा येत असल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कसब त्यांना नव्याने शोधावे लागणार आहे. सोनिका (सुरवीन चावला) आणि अक्षय (जय भानुशाली) हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ व स‘देह’ बुडालेले प्रेमवीर. सोनिका व अक्षय फोटोग्राफीच्या वेडातून एकत्र आलेले असतात. मात्र सोनिकावर नजर असते ती मंदार म्हात्रे (सुशांत सिंह) या बडय़ा राजकीय प्रस्थाची. सोनिकाला त्याने ‘कीप’ ठेवलेले असते. अक्षयला हे कळते तेव्हा तो सोनिकाला घेऊन गोव्याला पळून जातो. मात्र मंदार त्या दोघांना शोधून काढतो. अक्षयला ठार करतो. सोनिकाला जिवंत गाडतो. मात्र सुदैवाने सोनिका जीव वाचवण्यात यशस्वी होते. नंतर आपल्यावरील अन्यायाचा बदला ती घेते. सुरवीन चावलाने सोनिका बर्‍यापैकी वठवली आहे. तिच्या मुद्राभिनयापेक्षा अंगप्रदर्शनावर दिगदर्शकाचा जास्त भर दिसतो. तिनेही बिनधास्त काम केले आहे. सुशांत सिंहने मंदार म्हात्रेचा बेरकेपणा मस्त रंगवला आहे.