शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (16:43 IST)

पीके : चित्रपट समीक्षा

पीके (आमिर खान) पृथ्वीवर राहणारा नसतो. तो एक एलियन आहे. चारशे कोटी किलोमीटर दुरून तो पृथ्वीवर आला असतो. आपल्या ग्रहावर परत जाण्याचा त्याच्या रिमोट कुणीतरी चोरतो. जेव्हा रिमोटाबद्दल तो लोकांना विचारतो तर त्याला उत्तर मिळतं देव जाणे. तर तो देवाचा शोधात निघतो आणि कन्फ्यूज होतो. 
 
मंदिरात जातो तर म्हटले जाते की जोडे बाहेर काढून आत या, पण चर्चामध्ये जातो तर बूट घालून आत जातो. कुठे देवाला नारळाचा प्रसाद म्हणून दाखवण्यात येतो तर कुठे देवाला वाइनचा प्रसाद असतो. एक धर्म म्हणतो की सूर्यास्तच्या आधी भोजन केले पाहिजे तर दुसरा धर्म म्हणतो की सूर्यास्त झाल्यानंतर नंतर उपास सोडा. देवाची भेट घेण्यासाठी तो दानपेटीत फीस चढवतो, पण जेव्हा त्याला देव भेटत नाही तर तो दान पेटीतून रुपये परत काढून घेतो.  
 
तसचं तो आपल्या हरवलेल्या लॉकेटच्या शोधात एका शहरात दाखल होतो, तेथे त्याची भेट टीव्ही रिपोर्टर असलेल्या जगत जननी (अनुष्का शर्मा) सोबत होते. लॉकेटचा शोध घेत असताना तो भोजपूरी भाषा शिकतो. याच भाषेत तो इतरांशी बोलतो.(''संसार में भगवान एक नाही दूइ तरह के होते है। एक जउन हम लोगो को बनाये है अउर दूसरा जेकरा के संसार के बाबा लोग बना के मन्दिर में बइठा दिये है।'')  अशाच काही क्रांतिकारक आणि निर्भय संवादांच्या माध्यमातून राजकुमार हिराणी यांनी पीकेमध्ये देवाच्या नावावर सुरू असलेल्या धार्मिक उद्योगांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तो व्यवसायात बदललेल्या धर्मात बंधक असलेल्या देवाला मुक्त करण्याचे म्हणतो. ही गोष्ट लोकांच्या पचनी पडत नाही. सिनेमा भोळ्या पीकेच्या तार्किक प्रश्नांसोबत मनोरंजक पद्धतीने पुढे सरकतो. पीकेच्या गोष्टींचा हळूहळू लोकांवर परिणाम होते. पीके म्हणतो, धार्मिक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत, कारण त्यामागे विश्वास असतो.  
 
पटकथा : या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार हिराणी आणि अभिजात जोशी यांनी सामान्य लोकांचे दुःख समोर मांडले आहे. धर्मा आणि आस्थाच्या नावावर सुरू असलेल्या व्यवहार मनोरंजक पद्धतीने तार्किक रुपाने सादर केला आहे. सिनेमाची पटकथा उत्कृष्ट आहे. ‘पीके’मध्ये आमीरचे संवाद भोजपुरी भाषेत आहेत. आमीरने अशाप्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे.
 
दिग्दर्शन : पीके या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार हिराणी यांनी धर्म आणि देवावर एवढे प्रश्न उपस्थित केले आहेत, की सिनेमा संपता संपता आपल्या लक्षात येतं, की काही ढोंगी लोकांनी आपला चुकीचा हेतू साध्य करण्यासाठी देवाला माध्यम बनवले आहे. राजकुमार हिराणी आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत.
 
अभिनय : चित्रपटात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, संजय दत्त आणि बोमन ईरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण चित्रपटात आमिर खानने आजपर्यंतचे सर्वात बेस्ट परफॉरमेंस दिले आहे. या फिल्मला अर्थातच आमीर खानच्या अप्रतिम अभिनयाचा साज आहे. तर अनुष्का आणि सुशांत सिंह या दोघांनीही आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. बोमन इराणी, सौरभ शुक्ला आणि संजय दत्त यांच्या भूमिकाही पैसा वसूल करून जात आहेत. . 
 
म्युझिक : ‘पीके’ला मराठमोळा तडका लाभला आहे. या सिनेमाचं म्युझिक अजय-अतुल, शंतनू मोईत्रा आणि अंकित तिवारी यांनी दिलं आहे. हे सर्वजण म्युझिकच्या खास शैलींसाठी प्रसिद्ध आहेत.
 
का बघावा? 
एकूण आपण म्हणू शकतो की राजकुमार हिराणी आणि आमिर खानने मिळून परत एकदा प्रेक्षकांसमोर एक जबरदस्त चित्रपट प्रस्तुत केले आहे म्हणून एकदा तरी हा चित्रपट नक्कीच बघायला हरकत नाही. 
 
बॅनर : विनोद चोपड़ा फिल्म्स, राजकुमार हिराणी फिल्म्स
निर्माता : विधु विनोद चोपड़ा, राजकुमार हिराणी  
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
संगीत : शांतनु मोइत्रा, अजय-अतुल
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंह राजपूत, बोमन इराणी, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी, रणबीर कपूर (पाहुणा कलाकार) 
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 तास 33 मिनिट  
रेटिंग : 4/5