शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2015 (14:14 IST)

बाजीराव-मस्तानी : चित्रपट परीक्षण

संजयलीला भन्साळी पुन्हा एकदा नवीन सिनेमासह प्रेक्षकांसमोर आला आहे. यंदा संजयलीला भन्साळी यांनी मराठा पेशवा 'बाजीराव मस्तानी' सिनेमाची भव्यता पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमात त्याने मराठा पेशवा बाजीराव-मस्तानी यांची कथा पडद्यावर दाखवली आहे. याला भन्साळीने आपल्या सिग्नेचर स्टाइलमध्ये बनवले आहे. अॅक्शन दृश्यांना व्हीएफएक्सने चित्रित करण्यात आले आहे. 
सिनेमाचे नाव

बाजीराव मस्तानी

क्रिटिक रेटिंग

4
कलाकार रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी
निर्माता संजय लीला भन्साळी
संगीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी

जॉनर

ऐतिहासिक प्रेमकथा
चित्रपटाची कथा  
रणवीर सिंहने ग्रेट मराठा वॉरियर पेशवा बाजीराव यांची भूमिका साकारली आहे. बाजीराव एक उत्कृष्ट योद्धा आणि असा शासक आहे, ज्याला आपले साम्राज्य सर्वदूर पसरवायचे आहे. प्रियंकाने बाजीराव यांची पत्नी काशीबाईचे आणि दीपिकाने बाजीराव यांच्या दुसर्‍या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच लव्ह स्टोरीचे प्रमुख एंगल आहे. मस्तानीशी भेट झाल्यानंतर बाजीराव तिचे दिवाने होतात. ते मस्तानीशी लग्न करून तिला पुण्यात आणतात. बाजीराव यांच्या जीवनात मस्तानीचे येणे पेशवा घराण्याला आवडत नाही. बाजीराव यांची पहिली बायको काशीबाईदेखील मस्तानीमुळे चिंतित असते. कथेत बाजीराव-मस्तानी आणि काशीबाई यांचा लव्ह-ट्रंगल दाखवण्यात आला आहे. यातच राजघराण्यात वर-चढीचा खेळ सुरू होतो. या तिन्ही कलाकारांवर पूर्ण चित्रपट फोकस आहे.  

कशी आहे अॅक्टिंग  
रणवीर, दीपिका आणि प्रियंकाने दर्जेदार अॅक्टिंग केली आहे. जेव्हाकी मिलिंद सोमण (पेशवेच्या सल्लागारच्या भूमिकेत) आणि तन्वी आजमी (बाजीराव यांची आई राधाबाईच्या भूमिकेत)ने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. दीपिका आणि प्रियंका यांच्यात चित्रित करण्यात आलेले अनेक सीन्स कमालीचे आहेत. हे सीन्स पाहून वास्तवात जाणवते, की या सिनेमाची कहाणी केवळ 'बाजीराव-मस्तानी'वरच केंद्रित केलेली नाहीये. प्रकाश कपाडियाने लिहिलेले डायलॉग बर्‍याच दिवसांपर्यंत लक्षात ठेवण्यात येतील. कथेच्या बाबतीत भंसाळी यांचे निर्देशनपण उत्तम आहे.

म्युझिक  
सर्वच गाणे लक्षात राहण्यासारखे आहेत. कथेनुसार म्युझिकवर मराठीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. रिलीज अगोदरच पिंगा आणि मल्हारी सारखे गाणे लोकांच्या तोंडात रुळली आहेत. 

बघावे की नाही  
थियेटरमध्ये रियलिस्टिक मूव्ही बघणार्‍यांना हे चित्रपट पसंत नाही पडणार. हे चित्रपट त्या लोकांसाठी फार उत्तम साबीत होणार आहे, जे मोठ्या पडद्यावर भव्य सिनेमा पाहणे पसंत करतात. ‘बाहुबली’च्या सक्सेस नंतर स्क्रीनवर शानदार भव्यता बघणार्‍या लोकांना  बाजीराव-मस्तानी निराश नाही करणार.