Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

कॅनडात शिकायला जायचंय?

वेबदुनिया|
कॅनडात शिक्षण घ्यायचे असेल तर, काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. सर्वांत आधी तुम्हाला कॅनडातील स्कूल बोर्ड किंवा सेकंडरी स्कूल इन्स्टिट्यूटचे प्रवेश पत्र मिळवावे लागेल त्याशिवाय कॅनडात शिक्षणासाठी प्रवेश मिळणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे आधी कॅनडाचा व्हिसा मिळवावा लागेल. हे काम जरा कठीण आहे. याविषयाची अधिक माहिती तुम्हाला डब्लू डब्लू डब्लू डॉट सीआयआय डॉट जीसी डॉट सीए या संकेतस्थळावर मिळू शकते.

कॅनडात शिक्षणासाठी आधी तुम्हाला व्हिजिटर व्हिसा मिळवावा लागेल त्याशिवाय कोणतीही शिक्षण संस्था तुम्हाला प्रवेश देणारच नाही. ही दोन्ही कामे झाली तर कॅनडात शिक्षणाचा मार्ग मोकळा झालाच म्हणून समजा. परंतु, यासाठी तुम्हाला लवकर हालचाल करणे गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :